ज्योतिषशास्त्रानुसार वास्तू शास्त्रदेखील तितकेच महत्वाचे असते. बऱ्याचदा आपण ज्या ठिकाणी राहतो, वास्तव्य करतो त्या ठिकाणाचा वास्तूचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर पडत असतो. अनेक लोकांना प्रचंड कष्ट घेऊन आणि प्रयत्न करुनदेखील प्रगती पाहायला मिळत नाही. शिवाय घरामध्ये सतत वादविवाद आणि मतभेद सुरु असतात. पैसे तर भरपूर येतात मात्र टिकत अजिबात नाहीत. अशावेळी वास्तू दोष असण्याची दाट शक्यता असते. वास्तूदोष असल्यानेदेखील या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बहुतांश लोक वास्तूशास्त्राचा आधार घेऊन घरामध्ये सुखसमृद्धी टिकविण्याचा प्रयत्न करतात. वास्तू शास्त्रात तुमच्या वास्तूदोषाला अनुसरुन विविध उपाय सांगण्यात येतात. या उपायांच्या आधारे तुमच्या घरातील समस्या दूर होऊन आनंद आणि सुखसमृद्धी वास करते. वास्तुशास्त्रात राशीनुसार योग्य दिशेपासून, घरात कोणत्या गोष्टी ठेवणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी ठेवणे अशुभ आहे याबाबतही सल्ला देण्यात येतो. आज आपण मेष राशीच्या लोकांनी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे ते पाहणार आहोत.
शास्त्रानुसार अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. त्यामुळेच अनेक लोक विविध मार्गाने इतरांना भोजन वाढत असतात. याला अनुसरुन मेष राशीच्या लोकांना दर दोन महिन्यांनी घरात महाप्रसाद किंवा भंडारा करणे शुभ असते. त्यामुळे तुमच्या घरातील अडचणी दूर होतात. सुखसमृद्धी येते. व्यवसाय विस्तारण्यास मदत होते. शिवाय आर्थिक स्थिती मजबूत होते.
वास्तूशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी घरातील देवघरात कुबेर यंत्र अवश्य ठेवावे. कुबेर यंत्र घरात ठेवल्याने तुम्हाला कुबेर देवाचा शुभ आशीर्वाद लाभतो. आणि त्यामुळे घरात कोणतेही आर्थिक संकट येत नाही. विविध मार्गाने धनलाभ व्हायला सुरुवात होते. पैशांची चणचण भासत नाही. महत्वाचे म्हणजे कुबेर यंत्राचे योग्य पद्धतीने पूजन करुन उत्तर दिशेलाच हे यंत्र ठेवावे. असे केल्याने कुबेर यंत्राचा शुभ लाभ मिळतो.
सोबतच मेष राशीच्या लोकांनी घरातील दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या कोपऱ्यातच असणाऱ्या लॉकरमध्ये महत्वाचे ऐवज आणि नोकरीसंबंधी कागदपत्रे ठेवावी. असे केल्याने तुमच्या घरात धन-धान्याची भरभराटी होते. व्यवसायात यश मिळते. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होतो. शिवाय घरात सुख टिकून राहते. शिवाय घराला ब्रह्माण्डातील ऊर्जेचे स्तोत्र समजले जाते. अशावेळी मेष राशीच्या लोकांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात तुळशीचे रोप लावणे आणि ते वाढवणे शुभ ठरते. तसेच या लोकांनी सायंकाळच्या वेळी घरातील ईशान्य कोपऱ्यात कापूर जाळल्याने घरात वाईट, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
संबंधित बातम्या