Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रात राशिचक्राला खूप महत्त्व आहे. राशीचक्रामध्ये एकूण १२ राशी आहेत आणि प्रत्येक राशी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. असे मानले जाते की, प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या स्वभाव त्यांच्या कुंडलीतील ग्रहावर आधारीत असतो. राशीनुसार प्रत्येक व्यक्तिचा स्वभाव, गुण, व्यक्तीमत्व सांगता येत असतं.
आजकाल खरे मित्र भेटणे फार कठीण आहे, कारण प्रत्येक व्यक्तीवर सहज विश्वास ठेवता येत नाही. पण या ३ राशीचे लोक खूप विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झालं आहे. या राशीचे लोक खऱ्या मनाने आणि प्रामाणिकपणाने संबंध ठेवण्यासाठी ओळखले जातात. असे मानले जाते की, या राशीच्या व्यक्ती कोणाशीही सहज मैत्री करत नाहीत किंवा ते कोणाशीही फारसे बोलत नाहीत. तसेच जीवनातील गुपीतही शेअर करत नाहीत, परंतु मैत्री वाढल्यानंतर ते इतरांसाठी मरण्यासही तयार असतात. एखाद्याला आपल्या जवळचं केलं आणि घट्ट मैत्री झाली तर ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.
ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक मैत्री राखण्यात पटाईत असतात. ते नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. सुख-दु:खात आपल्या जीवलग मित्र किंवा मैत्रिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतात. या विशेष गुणांमुळे त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो.
असे मानले जाते की, सिंह राशीचे लोक उत्तम मैत्री निभावतात. ही लोकं त्यांच्या मित्रांविरुद्ध वाईट एक शब्द देखील ऐकून घेऊ शकत नाहीत. मैत्री असो की नातेसंबंध, ते कधीही त्यांच्या फायद्याचा किंवा तोट्याचा विचार करत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीत आपल्या मित्र-मैत्रिणीला साथ देतात. ते त्यांच्या मित्रांचे वाईट अजिबात सहन करत नाहीत, ते लगेच त्यांच्या मित्रांसाठी इतरांशी भांडतात.
ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे लोकही चांगले आणि खरे मित्र असल्याचे सिद्ध करतात. त्यांच्या मैत्रीवर १ टक्का ही शंका करू शकत नाही. मैत्रीसाठी ते काहीही करू शकतात. ते मैत्री आणि कुटुंबाबद्दल खूप भावनिक असतात. कोणत्याही संकटात आपल्या मित्रांना शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करतात. प्रत्येकजण त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देतात आणि त्यांचे कौतुक करतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)