आईवडिल नेहमीच आपल्या मुलांना सुखी, निरोगी आणि यशस्वी पाहण्याची अपेक्षा करत असतात. तसेच आपली मुले आपले संस्कार आत्मसात करुन आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करावे अशी त्यांची आशा असते. परंतु अनेकांना माहिती नसेल की, मुलांच्या नावाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. परंतु सध्या बदलत्या काळानुसार ट्रेंडनुसार लोक कोणतेही नाव आपल्या मुलांना देत असतात. जोतिषशास्त्रानुसार आपल्या मुलाचे नाव ठेवण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या मुलाच्या आयुष्यावर त्याच्या नावाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही.
जोतिष शास्त्रानुसार मुलाच्या जन्मानंतर त्याच्या जन्म तारीख आणि वेळेवरुन कुंडली तयार केली जाते. या कुंडलीला अनुसरुन जोतिषीय सल्ला घेऊन ग्रह-नक्षत्रांच्या आधारे जो मुळाक्षर निघतो, त्यावरुन आपल्या मुलासाठी योग्य नाव ठेवावे. ते नाव तुमच्या मुलांसाठी शुभ लाभ देणारे असते. त्यांना आयुष्यात विनाकारण त्रास आणि अडचणी सहन कराव्या लागत नाहीत. जाणून घ्या नक्षत्रावरून बाळाचे नाव.
अश्विनी नक्षत्र हे तब्बल २७ नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र आहे. हे नक्षत्र मेष राशीच्या पहिल्या चरणात स्थित असते. केतू हा या नक्षत्राचा स्वामी ग्रह असतो. त्यामुळे या नक्षत्रात जन्मलेल्या मुलांची नावे चू, चे, चो, ला या मुळाक्षरावरुन ठेवल्यास अतिशय शुभ असते.
वृषभ राशीच्या पहिल्या चरणात येणाऱ्या नक्षत्राला भरणी नक्षत्र म्हटले जाते. या नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह बुद्धी, सौंदर्य, प्रेम,सुखसमृद्धीचे प्रतीक आहे. या नक्षत्रातील मुलांची नावे ला, ली, लू, ले, लो या मुळाक्षरावरुन ठेवल्यास अत्यंत प्रभावी ठरते.
कृतिका नक्षत्र हे एक आग्नेय नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह सूर्य असतो. त्यामुळेच या नक्षत्रातील मुले अत्यंत धाडसी, तेजस्वी आणि प्रभावी असतात. या नक्षत्रातील मुलांची नावे आ,ई, ऊ, ए या मुळाक्षरावरुन ठेवणे योग्य असते.
वृषभ राशीच्या चौथ्या चरणात असलेले नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय. चंद्र हा या नक्षत्राचा स्वामी ग्रह असतो. या नक्षत्रात जन्म झालेली मुले सुंदर, हुशार आणि अतिशय कलात्मक असतात. त्यांना अभिनय, संगीत, गायन यामध्ये विशेष रुची असते. या नक्षत्रातील मुलांची नावे ओ, वा, वी, वू या मुळाक्षरावरुन ठ्येवण्याचा सल्ला जोतिष देतात.
संबंधित बातम्या