मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Iron Ring : लोखंडी अंगठीने लाभते शनी कृपा, होतो पैशांचा पाऊस! मात्र याच राशींनी धारण करणे योग्य

Iron Ring : लोखंडी अंगठीने लाभते शनी कृपा, होतो पैशांचा पाऊस! मात्र याच राशींनी धारण करणे योग्य

Jun 22, 2024 12:12 PM IST

Ratna Jyotish : वैदिक शास्त्रानुसार लोह धातूत शनिदेव वास करतात. त्यामुळेच लोखंडी आभूषणे धारण करणाऱ्या लोकांवर शनिदेवाची शुभ कृपादृष्टी दिसून येते.

लोखंडी अंगठी
लोखंडी अंगठी

रत्न शास्त्रात विविध रत्न आणि धातूंबाबत माहिती देण्यात आली आहे. शास्त्रानुसार प्रत्येक रत्न आणि धातूचे एक वेगळे वैशिष्टय आहे. या धातूंमध्ये विविध गुणधर्म असतात. तसेच हे धातू किंवा रत्न प्रत्येक एका देवाला समर्पित असतात. त्यानुसारच लोह धातू म्हणजेच लोखंड शनिदेवाचा धातू म्हणून संबोधला जातो. वैदिक शास्त्रानुसार लोह धातूत शनिदेव वास करतात. त्यामुळेच लोखंडी आभूषणे धारण करणाऱ्या लोकांवर शनिदेवाची शुभ कृपादृष्टी दिसून येते. त्यामुळेच लोखंडापासून बनलेली अंगठी, छल्ला असे दागिने अनेकजण आपल्या शरीरावर धारण करत असतात.

तुम्ही अनेक लोकांच्या हातात लोखंडी कडे पाहिले असतील. बहुतेक लोक त्यांच्या हाताच्या बोटांमध्ये लोखंडी अंगठी घालतात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की, लोखंडी अंगठी धारण केल्याने काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतो आणि त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते. वास्तविक, लोखंड किंवा लोह धातूचा संबंध शनि ग्रहाशी आहे. शास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही लोखंडाची अंगठी घातली जाते तेव्हा शनिदोष दूर होऊन शनिदेवाची शुभ दृष्टी प्राप्त होण्यास मदत होते.

ज्योतिषशास्त्रानुसार, एखादा व्यक्ती प्रचंड कष्ट आणि प्रयत्न करुनसुद्धा अपयशी होत असेल तर त्याच्यावर ग्रहांचा अशुभ प्रभाव असतो. कुंडलीतील ग्रह जेव्हा अशुभ स्थानात असतात तेव्हा त्या व्यक्तीला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीदेवाचा प्रकोप असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रचंड अडचणी येत असतात. ज्योतिष शास्त्रात ग्रहदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे रत्न किंवा धातू परिधान करणे होय.

लोखंडी अंगठी धारण करण्याचे फायदे

शनीदेवाचा प्रकोप दूर करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या उपायांमध्ये लोखंडी अंगठी धारण करणे हा एक महत्वाचा उपाय असतो. लोखंडी अंगठी परिधान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर असलेला अशुभ प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो.शास्त्रानुसार लोखंडी अंगठी घातल्याने आयुष्यात असलेल्या समस्या दूर होतात. घरातील वादविवाद संपुष्ठात येऊन प्रेम वाढीस लागते. आर्थिक स्थिती सुधारते. आणि आयुष्यात सुखसमृद्धी येते.

लोखंडी अंगठी हातात घालण्याची योग्य पद्धत आणि वेळ

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवारच्या दिवशी लोखंडी अंगठी धारण करणे शुभ असते. त्यात जर शनिवारी रोहिणी पुष्य, अनुराधा किंवा उत्तरा भाद्रपद नक्षत्र असेल तर अधिकच उत्तम ठरते. शिवाय अंगठीचा विशेष लाभ मिळवण्यासाठी ती योग्य पद्धतीने धारण करणे आवश्यक असते. शास्त्रानुसार अंगठी धारण करायच्या दिवशी सकाळी स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा. आणि मग अंगठी धारण करावी. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शिवाय पुरुषांनी उजव्या हाताच्या मोठ्या बोटात आणि स्त्रियांनी डाव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी परिधान करणे योग्य असते.

कोणत्या राशीने धारण करावी लोखंडी अंगठी?

ज्योतिष शास्त्रानुसार सरकट सगळ्या लोकांनी एखादे रत्न किंवा धातू परिधान करणे योग्य नसते. त्या-त्या व्यक्तींनी ज्योतिषांचा सल्ला घेऊन आपल्या राशीनुसार ते धारण करणे सोयीस्कर असते. नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. ज्योतिषीय अभ्यासानुसार लोखंडी अंगठी मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी धारण करणे अतिशय शुभ असते. मात्र इतर राशींनी ही अंगठी धारण करण्यापूर्वी ज्योतिष्यांचा सल्ला अवश्य घ्या.

WhatsApp channel
विभाग