ज्योतिषशास्त्रात राशीभविष्य, अंकभविष्य, वास्तुशात्र, हस्तरेखाशास्त्र याप्रमाणेच रत्नशास्त्राला देखील प्रचंड महत्व आहे. रत्नशास्त्रामध्ये मनुष्याच्या प्रत्येक अडचणीवर उपाय म्हणून एखाद्या रत्नाचा उपाय सांगण्यात येतो. शास्त्रानुसार हे रत्न तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करण्याची ऊर्जा देतात. शिवाय तुमच्या विविध प्रकारच्या अडचणी दूर करण्यास मदत करतात. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राशीनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्या व्यक्तीला त्या रत्नाचा पूर्ण लाभ मिळण्यास मदत व्हावी.
रत्नशास्त्रात एकूण ८ रत्ने असतात. तर इतर ८४ उपरत्ने असतात. मनुष्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणीनुसार त्यांना ते विशिष्ट रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो. रत्नशास्त्रातील प्रत्येक रत्नाचे एक खास वैशिष्ट्य असते. त्यानुसार एक विशिष्ट गुणधर्मांचे रत्न म्हणजे 'पितांबरी नीलम' रत्न होय. शास्त्रानुसार या रत्नाचा संबंध शनिदेव आणि बृहस्पतीदेव गुरु यांच्याशी असतोया रत्नामध्ये लाल आणि पिवळ्या अशा दोन्ही रंगाच्या छटा असतात. त्यामुळेच हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीला शनिदेव आणि गुरुदेव दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे हे लोक आपल्या आयुष्यात प्रचंड प्रगती करतात. नेहमी सकारात्मक राहतात. पाहूया कोणत्या राशीच्या लोकांनी हे रत्न धारण करणे योग्य असते. आणि त्याचे नियम काय?
ज्योतिष रत्न शास्त्रानुसार प्रत्येक रत्न धारण करण्याचे काही खास नियम असतात. त्यातीलच पहिला नियम म्हणजे कोणतेही रत्न सरसकट सर्वांनी धारण करू नये. प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार रत्न धारण करणे आवश्यक असते. अथवा कोणत्याही राशीने कोणतेही रत्न धारण केल्यास नुकसानही सहन करावे लागू शकते. हा नियम पितांबरी नीलम रत्न धारण करतानासुद्धा लागू होतो. शास्त्रानुसार, पितांबरी नीलम हे रत्न कुंभ, मकर, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी धारण करणे लाभदायक असते. मात्र रत्न धारण करताना कुंडलीतील शनी आणि गुरुची स्थिती पाहणे आवश्यक असते. कुंडलीत शनी आणि गुरु पंचम, नवम आणि दशम घरात असल्यास हे रत्न धारण करावे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी आणि गुरु कमजोर असेल त्यांनी पितांबरी नीलम धारण करून गोमेद धारण करणे टाळावे.
रत्नशास्त्रानुसार पितांबरी धारण केल्याने त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते. बौद्धिक क्षमता सुधारते. निर्णय घेण्याची क्षमता चांगली होते. कामामध्ये प्रचंड सुधारणा होते. व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी बनते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. पैसे कमविण्याचे नवे मार्ग सापडतात. उत्पन्नात वाढ होते. पैसे आल्याने राहणीमान सुधारते. या रत्नाच्या साहाय्याने साडेसातीचा त्रास कमी केला जाऊ शकतो. उद्योग-व्यवसायात भरभराटी होते. करिअरमध्ये वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते.
पितांबरी नीलम हे रत्न पंचधातूमध्ये घडवून धारण करावे. शिवाय हे रत्न ७ किंवा ८ भार वजनी असावे. शनिवारी किंवा गुरुवारी हे रत्न धारण करणे फायद्याचे असते. हे रत्न हाताच्या मधल्या बोटात घालावे. हे रत्न घालण्यापूर्वी ते गाईचे दूध किंवा गंगाजलमध्ये शुद्ध करून मग धारण करावे. शिवाय रत्न धारण केल्यानंतर शनिदेव आणि गुरुदेवाशी संबंधित वस्तूंचे दान अवश्य करावे.
संबंधित बातम्या