वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह आपल्या निश्चित वेळेतच राशी बदल करत असतात. या प्रक्रियेला गोचर किंवा संक्रमण म्हटले जाते. शास्त्रांनुसार गोचरसाठी शनिदेव सर्वात जास्त वेळ घेतात. जवळपास अडीच वर्षांनंतर शनिदेव गोचर करतात. तर दुसरीकडे चंद्र हा असा ग्रह आहे जो गोचरसाठी सर्वात कमी कालावधी घेतो. चंद्र अवघ्या एक ते दीड तासात राशी परिवर्तन करत असतो. त्यामुळे चंद्र दररोज विविध योगांची निर्मिती करतच असतो. चंद्राच्या भ्रमणातून निर्माण झालेल्या योगांचा परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होत असतो.
आज बुधवारच्या दिवशी चंद्र भ्रमण करत आहे. चंद्र कुंभ राशीत विराजमान होत आहे. चंद्राच्या कुंभ राशीत जाण्याने अनेक हालचाली घडून येत आहेत. यामध्ये विविध योग घटित होत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे चंद्र भ्रमणातून 'सौभाग्य' योगाची निर्मिती होत आहे. इतकेच नव्हे तर आज सौभाग्य योगासोबत, शोभन योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग घडून येत आहे. या सर्व शुभ योगांचा शुभ परिणाम कोणत्या राशींवर होणार ते आपण जाणून घेऊया.
तूळ राशीच्या लोकांना आजच्या सौभाग्य योगाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे. या योगात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. हातात घेतलेली कामे विनाअडथळा पूर्ण होतील. भाग्याची साथ मिळाल्याने आर्थिक फायदा होईल. उत्पन्नात वाढ झाल्याने घरातील भौतिक सुखांमध्ये आपोआप वाढ होईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. अनेक दिवसांपासून अडकलेले धन परत मिळेल. कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुतंवणूक करण्याचा विचार असल्यास आजचा दिवस शुभ आहे.
आज तयार झालेल्या सौभाग्य योग आणि शोभन योगाचा फायदा कुंभ राशीच्या लोकांनासुद्धा मिळणार आहे. याकाळात तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. खिशात पैसे आल्याने आर्थिक चणचण दूर होईल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या ओळखीतून पुढे तुम्हाला फायदा मिळेल. उद्योग-व्यापारात नफा होऊन विस्तार होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत रोमँटिक मूड राहील. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल.
मकर राशीच्या लोकांना सौभाग्य योग फायदेशीर ठरणार आहे. या लोकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण होईल. प्रत्येक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पडेल. व्यवसायात अडकलेल्या डील पूर्ण होतील. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना प्रचंड फायदा मिळणार आहे. महत्वाच्या कामात कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. भावंडांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचे धाडस कराल. त्यातून सकारात्मक परिणाम मिळतील.
संबंधित बातम्या