ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात कार्यरत असलेले नऊ ग्रह. मानवी आयुष्याशी निगडित आहेत. या ग्रहांच्या हालचालींचा थेट परिणाम मनुष्याच्या आयुष्यात होत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरमधून विविध योग जुळून येत असतात. हे योग राशीचक्रातील राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम टाकत असतात. या परिणामातून राशींचे भविष्य ठरत असते. अशाप्रकारे राशींच्या माध्यमातून ग्रह मनुष्यावर प्रभाव टाकत असतात. जुलै महिन्यातसुद्धा अनेक मोठमोठ्या ग्रहांच्या हालचाली घडून येत आहेत. यामधून अनेक योग निर्मित होत आहेत.
आज गुरुवार १८ जुलै २०२४ रोजी आषाढ मासातील शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. तर आज चंद्र वृश्चिक राशीतून निघून धनु राशीत प्रवेश करत आहे. चंद्राच्या या गोचरमधून आज ब्रह्म योग आणि रवि योग हे शुभ योग जुळून येत आहेत. चंद्र हा गोचरसाठी नऊ ग्रहांपैकी सर्वात कमी कालावधी घेतो. अवघ्या एक ते दीड दिवसांमध्ये चंद्र आपली राशी बदलत असतो. चंद्राच्या या भ्रमणातून दररोज विविध योग घटित होतात. आज निर्माण झालेल्या ब्रह्म योग आणि रवि योगाचा फायदा कोणत्या राशींना मिळणार ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांना आज ब्रह्म योग आणि रवि योगाचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. याकाळात तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. पार्ट टाइम उद्योग करण्याची इच्छा असेल तर त्यातून लाभ मिळेल. या योगात केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळतील. सामाजिक कार्यांमध्ये रुची वाढेल. नोकरदारवर्गाला प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध होतील. तुमच्या कमाईत वाढ होईल. त्यातून आर्थिक स्थिती भक्कम होईल. घरात भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी कराल. जोडीदारासोबत डिनर डेटची योजना आखाल. त्यामुळे नात्यात प्रेम वाढेल.
तूळ राशीच्या लोकांना ब्रह्म योग आणि रवि योग अत्यंत फलदायी ठरणार आहे. याकाळात जुन्या मित्रांच्या गाठीभेटी जुळून येतील. त्यांच्याकडून महत्वाची माहिती समजेल. करिअरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. विविध मार्गाने धनलाभ होईल.आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदारासोबत एखाद्या शुभ कार्यात सहभाग घ्याल. त्याठिकाणी तुमच्या क्षेत्रातील प्रभावित व्यक्तींची भेट होईल.आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील. त्यामुळे प्रकृती उत्तम राहील. उद्योग-व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल.
कुंभ राशीच्या लोकांना ब्रह्म योग आणि रवि योग लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. त्यामुळे हातात घेतलेली सर्व कामे पार व्यवस्थित पडतील. कार्यक्षेत्रात विरोधकांचे डाव उलटून लावण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे विरोधकांपासून सुटका मिळेल. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीचा लाभ आता मिळणार आहे.अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. पैसे कमावण्याचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
संबंधित बातम्या