मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rahu Ketu Gochar : १८ महिन्यांनी होतंय राहू-केतू गोचर! 'या' राशींना प्रत्येक कामात येणार अडचणी

Rahu Ketu Gochar : १८ महिन्यांनी होतंय राहू-केतू गोचर! 'या' राशींना प्रत्येक कामात येणार अडचणी

Jun 19, 2024 08:57 AM IST

Rahu Ketu Rashi Parivartan 2025 : ग्रहांच्या संक्रमणाने काही राशींना फायदा होणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. २०२५ मध्ये राहू आणि केतू काही राशीच्या लोकांना त्रास देताना दिसणार आहेत. पाहूया या राशी कोणत्या आहेत.

राहू केतू राशीपरिवर्तन
राहू केतू राशीपरिवर्तन

येणारे वर्ष म्हणजचे २०२५ ज्योतिष शास्त्राच्यादृष्टीने अत्यंत खास असणार आहे. नवग्रहांमध्ये राहू आणि केतू या दोन ग्रहांना पापी ग्रह म्हणून संबोधले जाते. हे दोन ग्रह २०२५ मध्ये विविध अनुभव देणार आहेत. शास्त्रानुसार जर एखादा ग्रह शुभ योग निर्माण करत असेल तर त्या राशींचे नशीब चमकते. मात्र याउलट जर एखादा ग्रह अशुभ परिणाम देत असेल तर त्या राशीच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात सतत अडचणी आणि अपयश यायला लागतात. २०२५ मध्ये राहू आणि केतू काही राशींना त्रास देताना दिसणार आहेत.

वैदिक शास्त्रानुसार, ठराविक काळानंतर ग्रह राशीपरिवर्तन करत असतात. त्यानुसार राहू तब्बल १८ महिन्यांनी राशी बदलत असतो. गेल्यावर्षी ३० ऑक्टोबर २०२३ मध्ये राहूने मीन राशीत प्रवेश केला होता. दरम्यान आता पुढच्या वर्षी १८ मे २०२५ रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर केतूसुद्धा राशीपरिवर्तन करणार आहे. गेल्यावर्षी केतूने कन्या राशीत प्रवेश केला होता. आता केतू २०२५ मध्ये सिंह राशीत विराजमान होणार आहे. या ग्रहांच्या संक्रमणाने काही राशींना फायदा होणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पाहूया या राशी कोणत्या आहेत.

मेष

येणाऱ्या २०२५ मध्ये मेष राशीला राहू आणि केतूच्या राशी परिवर्तनाचा नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. याकाळात घरामध्ये वादविवाद होऊन वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामात सतत अडचणी येतील.कार्यक्षेत्रात चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊ शकतो. कोणतेही काम करताना घाईगडबड करु नका. नाहीतर त्यातूनही नुकसानच पदरी पडेल. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात. त्वचे संबंधी तक्रारी जाणवू शकतात. या काळात तुम्हाला धीर आणि संयम ठेवणे गरजेचे आहे.

मिथुन

येत्या वर्षात मिथुन राशीलासुद्धा राहू आणि केतू संक्रमणाचा त्रास सहन करावा लागणार आहे. याकाळात तुमच्या करिअरचा वेग मंदावेल. कार्यक्षेत्रात सतत अडचणी येतील. कामामध्ये लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. मन विचलित होईल. ऑफिसमध्ये विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. सतत मानसिक तणाव जाणवेल. घरातील लोकांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवावे. नाहीतर मतभेद वादविवाद होण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीत संयम ठेऊन वाटचाल करा. अथवा कामे आणखी बिघडतील.

वृश्चिक

मेष आणि मिथुनप्रमाणेच वृश्चिक राशीच्या लोकांसुद्धा राहू-केतू संक्रमणाचा मारा सहन करावा लागणार आहे. राहू-केतूच्या अशुभ संक्रमणाने वृश्चिक राशीच्या आयुष्यात तणावात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसाय आणि नोकरीत विविध चॅलेंज पाहायला मिळतील. आरोग्यासंबंधित तक्रारी जाणवतील. त्यामुळे खानपानाच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक कामे रखडल्याने पैशांची चणचण भासेल. त्यामुळे जपून खर्च करा. विनावश्य्क खरेदी करणे टाळा.

WhatsApp channel