मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  शरीराच्या 'या' ६ भागांवर तीळ असणे असते अशुभ! नोकरीच नव्हे लव्ह लाईफमध्येही येतात अडचणी

शरीराच्या 'या' ६ भागांवर तीळ असणे असते अशुभ! नोकरीच नव्हे लव्ह लाईफमध्येही येतात अडचणी

Jun 12, 2024 12:41 PM IST

Samudrik Shastra About Body Moles : मनुष्याच्या शरीरावर असणारे तीळ ज्याप्रमाणे शुभ लाभ देतात त्याप्रमाणेच अशुभ लाभसुद्धा देतात. जाणून घ्या शरीराच्या कोणत्या भागावरच्या तीळ तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावर असणाऱ्या तिळांबाबत शुभ-अशुभ परिणाम
सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावर असणाऱ्या तिळांबाबत शुभ-अशुभ परिणाम

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, समुद्रशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य हे त्याच्या शरीराची रचना आणि त्यावरील तीळ यांच्या आधारे ठरवता येते. तीळ शुभ किंवा अशुभ स्थितीत आहे की नाही हे तीळाचे स्थान सांगते. समुद्रशास्त्रामध्ये तीळाचे वेगवेगळे अर्थ सांगण्यात आले आहेत. 

जोतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्रसुद्धा तितकेच महत्वाचे समजले जाते. सामुद्रिक शास्त्रात शरीरावर असणाऱ्या तिळांबाबत शुभ-अशुभ परिणाम सांगण्यात आले आहेत. शास्त्रानुसार मनुष्याच्या शरीरावरील काही भागांवर तीळ अत्यंत शुभ असतात. या तीळ इतक्या शुभ असतात की त्यांचे भाग्य उजळते व नशीब चमकते. मात्र याउलट काही भागांवर असलेल्या तीळ अत्यंत अशुभ असतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या व्यवसायिक, वैवाहिक आणि प्रेम जीवनामध्येसुद्धा विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शरीराच्या कोणत्या भागांवरील तीळ अशुभ असतात आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

करंगळीवर असणारे तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या करंगळीवर तीळ असते त्यांना अफाट संपत्ती मिळते. मात्र या लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. पैसा असूनसुद्धा यांना मानसिक समाधान लाभत नाही. त्यामुळे करंगळीवर तीळ असणे एकप्रकारे अशुभ समजले जाते.

डाव्या हातावर तीळ असणे

या शास्त्रानुसार व्यक्तीच्या डाव्या हातावर तीळ असणेसुद्धा काहीसे अशुभ असते. अशा व्यक्ती प्रचंड रागीट स्वभावाच्या असतात. आपल्या रागामुळे आयुष्यात अनेक संधी यांच्या हातातून निसटतात. तसेच हे लोक सतत इतरांची तुलना करत असतात. त्यामुळे त्यांना मनशांती लाभणे कठीण असते.

ओठांवर तीळ असणे

सामुद्रिक शास्त्रानुसार ओठांवर तीळ असणारी व्यक्ती अत्यंत लहरी स्वभावाची असते. एका गोष्टीवर या व्यक्ती ठाम राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते. तसेच अशा लोकांकडे पैसा तर येतो मात्र तो विनाकारण खर्चसुद्धा होतो.

कानावर तीळ असणे

कानावर तीळ असणे हे सुद्धा अशुभ असते. या लोकांनासुद्धा आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या लोकांना कोणत्याही गोष्टीत सहजासहजी यश मिळत नाही.

डोळ्यावर तीळ असणे

या शास्त्रामध्ये डोळ्यावर तीळ असण्याला अशुभ समजले जाते. या लोकांच्या आयुष्यात आणि वैवाहिक जीवनात सतत अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते.

अनामिका(रिंग फिंगर)वर तीळ असणे

शास्त्रानुसार अशा लोकांना डोळ्यासंबंधी आजारांचा सामना करावा लागतो. शिवाय या लोकांवर अनेक खोटे आरोपसुद्धा लागतात. त्यामुळे त्यांच्या मानसन्मानात तडजोड होते.

WhatsApp channel
विभाग