Food According To Zodiac Signs : राशीनुसार 'हे' भोजन तुमच्यासाठी बेस्ट! आरोग्यासोबतच होतील चमत्कारिक फायदे
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Food According To Zodiac Signs : राशीनुसार 'हे' भोजन तुमच्यासाठी बेस्ट! आरोग्यासोबतच होतील चमत्कारिक फायदे

Food According To Zodiac Signs : राशीनुसार 'हे' भोजन तुमच्यासाठी बेस्ट! आरोग्यासोबतच होतील चमत्कारिक फायदे

Jun 23, 2024 10:33 AM IST

Food According To Zodiac Signs : वैदिक शास्त्रानुसार व्यक्तींच्या भोजनाचा थेट संबंध ज्योतिषशास्त्रासोबत आहे. तुमच्या राशीनुसार कोणते अन्न तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते ते आपण जाणून घेऊया.

राशीनुसार तुमच्यासाठी सर्वोत्तम अन्न
राशीनुसार तुमच्यासाठी सर्वोत्तम अन्न

ज्योतिषशास्त्रात व्यक्तींचे केवळ भविष्य सांगण्यात येते अशी अनेकांची समजूत आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात भविष्यासोबतच व्यक्तींचा स्वभाव, गुणदोष, करिअर, खानपान, प्रेम जीव अशा अनेक गोष्टींबाबत अंदाज बांधण्यात येतात. वैदिक शास्त्रानुसार व्यक्तींच्या भोजनाचा थेट संबंध ज्योतिषशास्त्रासोबत आहे.

ज्योतिष अभ्यासानुसार, तुम्ही भोजनात जे पदार्थ सेवन करता. तुमचे ग्रह ते तुमच्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल बनवण्याचे काम करत असतात. आणि त्यानुसार तुमच्या शरीरावर आणि मानसिक स्वास्थ्यवर त्याचा परिणाम होत असतो. आज आपण अन्न ज्योतिषशास्त्राविषयी जाणून घेणार आहोत. तुमच्या राशीनुसार कोणते अन्न तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते ते आपण जाणून घेऊया.

मेष

मेष राशीचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मंगळचा रंग लाल आहे. मंगळ हा अग्नि तत्वाचा मुख्य ग्रह मानला जातो. त्यामुळेच या राशीच्या लोकांनी लाल फळे, लाल मसूर आणि बेसनच्या पदार्थांचे सेवन करावे.

वृषभ

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह धन, ज्ञान, शांती, प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. त्यामुळेच शुभ्र अन्नपदार्थांवर शुक्राचा अधिक प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी दूध, दही, दुधापासून बनवलेल्या मिठाई, तांदूळ आणि खीर यांचे सेवन केल्याने विशेष लाभ मिळतो.

मिथुन

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रहाला हिरव्या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे तुमच्या आहारात हिरवी मूग डाळ, पालेभाज्या आणि गव्हाचे सेवन करावे.

कर्क

मिथुन राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्र हा अतिशय शांत आणि शीतल स्वभावाचा ग्रह समजला जातो. थंड दूध, बदाम आणि मखाना यांचा भोजनात आवर्जून समावेश करावा. तसेच भात, दूध आणि दहीदेखील खाल्याने लाभ मिळतो.

सिंह

सिंह राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. या ग्रहाला पिवळा आणि नारंगी रंग प्रचंड प्रिय असतो. त्यामुळेच सिंह राशीच्या लोकांनी केसरचे पदार्थ, तूर डाळ, पिवळ्या रंगाची फळे, इत्यादी पदार्थांचा भोजनात समावेश केल्याने फायदा मिळतो.

कन्या

कन्या राशीचा स्वामी ग्रहसुद्धा बुध आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हिरव्या पालेभाज्या आणि नारळ पाणी सर्वोत्तम मानले जाते. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो.

तूळ

तूळ राशीचा स्वामी ग्रहसुद्धा शुक्र असतो. त्यामुळेच या लोकांनी दूध, दही, दुधापासून बनवलेल्या मिठाई, तांदूळ यासोबतच खीरसुद्धा खाणे फायद्याचे ठरते.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळेच या राशीच्या लोकांनी स्वतःला शांत ठेवण्यासाठी सफरचंद आणि डाळिंबसारख्या फळांचे सेवन करावे.

धनु

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु असतो. त्यामुळेच या लोकांनी पिवळ्या आणि केसरी रंगाच्या पदार्थांचे सेवन अधिक करावे. या लोकांनी आंबा, मोसंबीसारखी फळे आणि पिवळ्या रंगाच्या डाळी अधिक सेवन कराव्यात.

मकर

मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळेच या राशीच्या लोकांनी आपल्या भोजनात जांभूळ, काळी द्राक्षे, उडीद डाळ आणि कच्ची केळी यांचा समावेश करावा.

कुंभ

कुंभ राशीचा स्वामी ग्रहसुद्धा शनी आहे. त्यामुळे या लोकांनी आपल्या जेवणात खाद्यतेल म्हणून फक्त मोहरीचे तेल वापरावे. सोबतच शनिवारच्या दिवशी काळी तीळ आणि उडीद डाळ खावी.

मीन

मीन राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळेच तुम्हाला उष्ण पदार्थ अधिक लाभदायक ठरतात. या राशीच्या लोकांनी फुटण्याची डाळ आणि बेसनाचे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत.

Whats_app_banner