success mantra : आयुष्यात कोणतीच गोष्ट आधीपासून निश्चित नसते. त्यामुळे फक्त योग्य व्यवस्थापनानेच आपण आयुष्यात पुढे वाटचाल करू शकतो. आयुष्यात नेहमी प्रत्येक गोष्टीच सकारात्मक विचार करावा जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल. आपल्यामध्ये असलेल्या कमतरता काळजीपूर्वक पाहून त्यावर अभ्यास केल्याने, चुकांचे आकलन केल्याने आपला येणारा प्रत्येक दिवस आजपेक्षा चांगला असेल हे निश्चित. परंतु बऱ्याचवेळा सर्वकाही कटाक्षाने पाळूनसुद्धा आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येत नाहीत. अशावेळी तुम्हाला ग्रह नक्षत्रांच्या बदलांची दिशा जाणून घेऊन प्रयत्न करावे लागतील. जोतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांच्या बदलांना विशेष महत्व आहे.
आपला प्रत्येक दिवस सुफळ बनवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वावर अभ्यास करणे, वारंवार त्याच त्याच चुका टाळणे आवश्यक असते. अनेकांना रात्रंदिवस कष्ट करून, व्यक्तिमत्त्वात सुधारणा करूनसुद्धा काहीही सकारात्मक पदरात पडत नाही. त्यामुळे माणूस खचून जातो. त्यांना निराशा येऊ लागते. इतकेच नव्हे तर त्यांचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडते. तुमच्यासोबतही असेच होत असेल, तर तुम्हाला जाणकार व्यक्तींचा सल्ला घेण्याची गरज आहे. हा सल्ला राशीनुसार असेल किंवा तुमच्या जन्मतारखेनुसारही असू शकतो. राशी आणि अंकशास्त्रांचा वाण पाहून कोणतेही काम करावे की नको हे समजते. आणि त्यामुळे तुम्हाला नुकसान आणि निराशा होण्याची शक्यता कमी होते.
प्रत्येक व्यक्तीची रास वेगळी असते. शिवाय त्यांच्या जन्मतारखेनुसार त्यांचा भाग्यांकसुद्धा वेगळा असतो.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विविध गोष्टींचे वेगवेगळे परिणाम घडून येत असतात. एखाद्या ग्रहाने किंवा नक्षत्राने आपली जागा बदलली तर त्याचा परिणाम कोणत्या राशीसाठी फलदायी असेल तर कोणत्या राशीसाठी त्रासदायक असेल.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार आपल्या दैनंदिन सवयीमध्ये बदल करणे फायद्याचे ठरू शकते. ग्रह आणि नक्षत्र दररोज या राशीतून त्या राशीत प्रवेश करत असतात.त्यामुळे प्रत्येक राशींमध्ये दररोज काही ना काही अनुकूल प्रतिकूल बदल पाहायला मिळत असतो.
आपल्या संस्कृतीत राशीभविष्य आणि अंकभविष्य असे दोन भाग आहेत. बऱ्याच लोकांना राशीबाबत तर माहिती आहे. राशीचक्रातील १२ राशींची सगळयांनाच ओळख आहे. मात्र अंकभविष्यबाबत अनेकांना संभ्रम असतो. अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांक असे दोन पक्ष पडतात. उदाहरणार्थ तुम्ही जन्मतारीख १७ असेल तर त्यांची बेरीज करून येणारा ८ हा अंक तुमचा मूलांक आहे.तसेच तुमची संपूर्ण जन्मतारीख ८-४-१९९७ असेल तर तुमचा भाग्यांक २ असेल. या अंकशास्त्रानुसार तुम्हाला रोजच्या आयुष्यात कोणता अंक लकी ठरेल किंवा त्या त्या दिवशी कोणता रंग तुमच्यासाठी शुभ असेल याबाबत माहिती दिली जाते. अनेक लोकांना राशीभविष्य आणि अंकभविष्य पाहून प्रत्येक काम करण्याची सवय असते.
या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन स्वतःला कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक ठेवता येणे गरजेचे आहे. राशीभविष्य आणि अंकशास्त्र हा आपल्या मान्यतेचा एक भाग झाला. शेवटी आपल्याला यश मिळवण्यासाठी कष्ट करणे आणि स्वतःवर पूर्णतः विश्वास ठेवणे हे गरजेचे आहे.