Virgo Yearly Horoscope 2024 In Marathi: संपूर्ण वर्ष शनि आपल्या राशीच्या षष्ठ स्थानात विराजमान असेल. सुरवातीपासूनच शनीचा प्रभाव तुमच्या षष्ठ स्थानात विशेष रूपाने दृष्टी गोचर होईल. शनिदेव तुमच्या सहाव्या स्थानात विराजमान राहून तुमच्या भाग्य स्थान, व्यय स्थान आणि सुख स्थानावर दृष्टी ठेवेल. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या प्रति जागरूक राहावे लागेल कारण मानसिक आणि शारीरिक समस्याला सामोरे जावे लागु शकते. तुम्हाला चिंतीत करू शकतो. योग्य दिनचर्येचे पालन करावे लागेल. मातेच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरीच्या क्षेत्रात शनि तुम्हाला उत्तम यश प्रदान करेल आणि विदेश जाण्यात यशस्वी ही बनवू शकते. भाऊ बहिणीशी नातेसंबंध जपावे लागतील. वर्षाच्या पूर्वार्धात गुरु बृहस्पती तुमच्या अष्टम स्थानात आणि त्यानंतर तुमच्या भाग्य स्थानात राहतील यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यात सक्षम असाल. राहू आणि केतू तुमच्या पत्नी भार्या आणि तनु स्थानात असल्याने आपलं व्यक्तीमत्व, प्रकृती आणि कौटुंबिक जीवन यावर लक्ष केंद्रित करावं लागेल.
करिअर आणि धनसंपदा: वर्षाच्या पूर्वार्धात कर्मेश रवि मंगळ युती व शनि षष्ठात असल्याने व्यवसायात अवाजवी कल्पनांना थारा देऊ नये. आपणास आपल्या करिअरमध्ये चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. चुकीच्या विचारसरणीमुळे नुकसान होऊ शकते. नोकरीत बदल होण्याचे संकेत मिळतील. कोणताही निर्णय घेताना फक्त टोकाची भूमिका घेऊ नये. व्यवसायात तुमच्या प्रगतीचा वेग पाहून स्पर्धक तुम्हाला शह देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखण्याची शक्यता आहे. उद्योगक्षेत्रात भागीदारासोबत प्रत्येक करार काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असेल. ग्रहमान प्रतिकूल असल्याने आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु मे महिन्यानंतर भाग्य स्थानातील गुरू आपल्याला शुभ फल देईल आणि धन लाभाच्या बर्याच संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक परिश्रम करावे लागतील तरच यश मिळेल. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते. नवीन वाहन खरेदी कराल. ग्रहांच्या स्थितीनुसार ह्या वर्षाचा मध्यान्न काळानंतर आपणास नशिबाची साथ लाभणार असून ह्या वर्षी आपली कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल.
आरोग्य संपदाः या वर्षी पूर्वार्धात शनी षष्ठस्थानातून भ्रमण करणार आहे. गुरू अष्टमस्थ तर राहु नेपच्यून सारख्या ग्रहाबराबेर असणार आहे. त्यामुळे जुनी दुखणी डोके वर काढतील. रोगाचे निदान लवकर होणार नाही. औषध घेताना पारखून घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना पायाची दुखणी जाणवतील. ऐन परीक्षेच्या वेळी संतती आजारी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या आरोग्याबद्दल काळजी पूर्वक राहा. केतुमुळे तुम्हाला वेळोवेळी मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही चुकीमुळे आरोग्य समस्या वाढू देऊ नका. परंतु कोणत्याही चुकीमुळे आरोग्य समस्या वाढू देऊ नका. व्यसनांपासून सावध रहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. तुम्हाला नेत्रपीडा सारख्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात. शनी तुमच्या सहाव्या स्थानात तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवेल. वर्षाच्या मध्यकाळानंतर गुरू बदलात आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील. परंतु या पूर्ण वर्षात आरोग्याबाबतीत सतर्कता घ्यावी लागेल.
कौटुंबिक जीवनः राहु सप्तमस्थ असल्याने कौटुंबिक जीवनात कुटुंबातील सदस्यांचा सहयोग न मिळाल्यामुळे तणाव वाढेल. कौटुंबिक जीवनात प्रेम व आपुलकी असल्याचे दिसून आले तरी त्यात काही समस्या निर्माण होण्याची संभावना असून आपणास त्यावर लक्ष द्यावे लागेल. वर्षाची सुरवात तुमच्यासाठी कमजोर राहण्याची शक्यता आहे. जानेवारी ते एप्रिल मध्ये थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आणि तणाव वाढण्याची शक्यता राहील. सुरवातीच्या महिन्यात आपल्या संततीच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. मुलांच्या मार्गदर्शना साठी थोडा वेळ राखून ठेवावा लागेल. स्पर्धापरीक्षा साठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील. वर्षाच्या उत्तरार्ध भावंडांचा दृष्टिकोन तुमच्या प्रति प्रेमपूर्वक राहील. तुमचे त्यांच्या सोबत नाते उत्तम राहील. यानंतर वेळ अपेक्षाकृत अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या मदतीने कार्यक्षेत्रात फायदा मिळेल. कौटुंबिक सदस्यांकडून चांगले सामंजस्य बनेल.
प्रेमसंबंधः हे वर्ष प्रेमसंबंधात समिश्र फल देणार राहील. यावर्षी प्रेमात पडलेल्या लोकांच्या जीवनात बरेच बदल घडतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. केतू तनु स्थानात असल्याने ची उपस्थिती तुम्हाला काही गोष्टींवर अंतर्मुख करेल. वैवाहिक जीवनात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून पावले टाकावीत. आपल्या मनातील गोष्टी मनमोकळे पणाने समोर ठेवा. वर्षाचा मध्यान्ननंतर प्रेम संबंधांसाठी कालखंड उत्तम राहील. तरुणांना आपला आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी उत्तम काळ आहे.
तरूण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. प्रेम व्यक्त करण्याचे प्रसंग येतील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. त्यासाठी आर्थिक झळही सोसाल. तरुणवर्ग प्रेमप्रकरणामध्ये रोखठोक व्यवहार करेल. प्रेमविवाहासाठी अग्रेसर होऊ शकतात. वर्षाच्या उत्तरार्ध तुमच्या प्रेमसंबंधांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.
२०२४ हे वर्ष आपणास कार्यक्षेत्रात आणि प्रकृतीबाबत समिश्र परिणाम देणारं ठरेल. एकंदरीत वर्ष फलाचा विचार केल्यास आपणास सप्टेंबर ऑक्टोबर व डिसेंबर काळ खूप उपयुक्त आणि उत्तम राहील. तसेच जानेवारी मार्च आणि एप्रिल मध्ये आपणास अनिष्ट परिणाम येण्याची शक्यता आहे.
(jaynews21@gmail.com)
(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)