Tula rashi 2024 Prediction : तुला राशीच्या भाग्यात दडलंय तरी काय, कसं असेल २०२४ चं वर्ष? वाचा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula rashi 2024 Prediction : तुला राशीच्या भाग्यात दडलंय तरी काय, कसं असेल २०२४ चं वर्ष? वाचा

Tula rashi 2024 Prediction : तुला राशीच्या भाग्यात दडलंय तरी काय, कसं असेल २०२४ चं वर्ष? वाचा

Dec 15, 2023 11:50 AM IST

Libra 2024 Horoscope Prediction: नव्या वर्षात तुला राशीतील लोकांच्या नशीबात काय असेल, जाणून घेऊयात.

Libra
Libra

Tula Yearly Horoscope In Marathi: वर्षाची सुरुवातीसचं शनी शुभ स्थान आहेत. आर्थिक रूपात तुम्हाला समृद्धी लाभणार आहे. नवीन व्यापाराची सुरूवात आणि व्यापारात विस्ताराचे ही उत्तम योग बनत आहेत. मनात संकल्प घेऊन तुम्ही वर्षाची सुरवात कराल यामुळे तुमचे जवळचे ही तुमच्यावर आनंदी होतील. गुरु केंद्रस्थानात आहेत. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. आर्थिक बाजू सुधारेल. उद्योगात कोणतीही जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. व्यापारात कुटुंबातील सदस्यांचे सहयोग राहील. आपण जर नोकरी करत असाल तर आपणास स्थान परिवर्तन करण्याची गरज भासू शकेल. गुरू अष्टमस्थ गेल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा योजना बनवून ही पूर्ण होऊ शकणार नाही परंतु निराश होऊ नका. राहु केतु अनिष्ट स्थानात असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विरोधकापासून सतर्क राहावे लागेल कारण ते तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात आणि त्या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि कौटुंबिक जबाबदारीवर लक्ष देण्याची गरज आहे.

करिअर आणि धनसंपदा: या वर्षाच्या प्रारंभीच अनुकूल शनिमुळे करिअर मध्ये अनुकूल परिणाम मिळतील. आपली आर्थिक उन्नती होईल. ग्रहस्थितीमुळे कीर्ती चमकेल. एखाद्या व्यक्तीसोबत केलेल्या कामाचा चांगला फायदा होईल. व्यवसायात विस्ताराचा अनेक संधी तुमच्यासमोर येतील. आपणास परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळतील. आपण जर परदेशात जाऊन तेथेच स्थायी होण्याचा विचार केलात तर त्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. व्यापारात लवकरात लवकर लाभ मिळविण्यासाठी आपणास आपल्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल. आपण आव्हानांचा सामना करण्यात अजिबात घाबरणार नाही आणि तुमची हीच गोष्ट तुमच्या करिअर मध्ये यश देईल. तुम्हाला जे ही काम मिळेल. तुम्ही आपल्या नोकरीमध्ये त्याला उत्तम पद्धतींनी करू शकाल. तुम्हाला उत्तम पद प्राप्ती होईल. वर्षाच्या उत्तरार्धात नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करावा लागेल कारण पहिल्या नोकरी मध्ये काही समस्या होऊ शकतात. व्यय स्थानातील केतु अनपेक्षित यश देईल.

आरोग्य संपदाः या वर्षात राहु रोग स्थानात आणि केतु व्ययात असल्याने आरोग्याबाबतीत समिश्र परिणाम मिळतील. मध्यम राहणार आहे. आरोग्य प्रती आपल्या प्रति निष्काळजीपणा टाळावा. संसर्गजन्य आजार लवकर बरे होतील पंरतु आपलं मानसिक स्वास्थ बिघडवतील. होतील की ते लवकर बरे ही तुम्हाला चिंतीत करून जाईल. मधुमेह असणाऱ्यांनी पथ्यपाणी संभाळावे. वर्षाच्या मध्यान्न मध्ये गुरू तुमच्या अष्टम स्थानात जातील आणि या वेळात तुम्हाला पोटासंबंधित विकारांना सामोरे जावे लागु शकते. पित्त प्रकृती आणि रक्तदाबाचे विकार असणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शनीबरोबर असलेल्या नेपच्यूनमुळे मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य आहार व व्यायामावर भर द्याल तर आरोग्य उत्तम राहील.

कौटुंबिक जीवनः ह्या वर्षात प्रारंभीच्या खूप उत्तम कालखंड असेल कारण कुटुंब स्थानात शुक्र भावात शुक्र आणि शनी पंचम स्थानात असल्याने कौटुंबिक एकोपा राहील. दांपत्यांसाठी हे वर्ष आनंददायी बातमी घेऊन येणारे असून त्यांना संतती प्राप्ती होईल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. संततीकडून समाधान व्यक्त कराल. वर्ष विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम असेल. शनी व शुक्र कौटुंबिक सुख प्रदान करेल. आपल्या कुटुंबातुन मिळणार सहकार्य आपल्या यशप्राप्तीत सहाय्यक बनेल. तुमची मदत ही राहील. यामुळे तुम्हाला आनंद होईल. कौटुंबिक सौहार्द राहील. वर्षाच्या उत्तरार्धात अष्टमस्थ गुरूमुळे आपल्या वैवाहिक जीवनातील शांतता भंग करू शकतो. घरात तरूणांची मत पटणार नाहीत. कौटुंबिक जीवनात तणाव आणि संघर्ष वाढू शकते म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळले पाहिजेत. मातापित्याच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

प्रेमसंबंधः या वर्षात तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होण्यास अनुकूल ग्रहमान आहेत. जर आपण खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल तर हे वर्ष आपल्यासाठी चांगले असेल. तुमचे प्रेम होण्याचे योग तयार होताना दिसत आहे. या वर्षीची सुरवात चांगल्या स्थितीत राहील. शुक्र कुटुंब स्थानात असल्याने तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनाला जिंकण्यात यशस्वी राहाल. त्यांच्या मनात जागा बनवाल. शनी पूर्ण वर्ष तुमच्या पंचम स्थानात असणार आहेत. तुम्ही प्रेम विवाह करण्यासाठी प्रयत्न कराल. प्रेम विवाह होण्याचे प्रबळ योग बनत आहेत. तुम्ही प्रयत्न कराल आणि यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल. केंद्र स्थानातील ग्रहयोग तुमच्या प्रेम जीवनाला उत्तम बनवतील आणि तुम्ही एकमेकांसोबत स्नेहपूर्वक वेळ व्यतीत कराल. तुमच्या नात्यात स्नेह आणि विश्वास वाढेल. वर्षाच्या मध्यान्न कालखंडानुसार गुरूच्या राशीपरिवर्तनानंतर प्रेमप्रकरणात काही समस्यांचा ही सामना करावा लागेल. काही संघर्षात्मक स्थिती निर्माण होईल. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

२०२४ या वर्षात आपणास अनपेक्षीत यश आणि कार्यक्षेत्रात उत्तम फलप्राप्ती होईल. आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. एकंदरीत वर्ष फलाचा विचार केल्यास आपणास मार्च एप्रिल व जुलै हा काळ खूप अनुकूल राहील. तसेच जुन सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये आपणास काही बाबतीत प्रतिकूल परिणाम येण्याची शक्यता आहे.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner