Love Life Prediction : जोडीदारासोबतचे मतभेद संपणार, लग्न जुळणार; या ४ राशींची ‘लव लाईफ’ असणार उत्तम
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Love Life Prediction : जोडीदारासोबतचे मतभेद संपणार, लग्न जुळणार; या ४ राशींची ‘लव लाईफ’ असणार उत्तम

Love Life Prediction : जोडीदारासोबतचे मतभेद संपणार, लग्न जुळणार; या ४ राशींची ‘लव लाईफ’ असणार उत्तम

May 04, 2024 05:00 PM IST

Love Life Prediction 4 May 2024 : आज शनिवार ४ मे रोजी, वरुथिनी एकादशी साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. याचा सकारत्मक परिणाम तुमच्या लव लाईफवरसुद्धा होणार असल्याचे शास्त्र सांगते.

लव होरोस्कोप, राशीभविष्य
लव होरोस्कोप, राशीभविष्य

जोतिषशास्त्रात लव लाईफबाबतदेखील अंदाज दर्शविले जातात. ग्रह-नक्षत्रांच्या बदलाचा परिणाम तुमच्या लव लाईफवरसुद्धा होतो. त्यामुळे अनेकजण लव लाईफमध्ये संतुलन ठेवण्यासाठी जोतिषशास्त्राचा आधार घेतात. आज शनिवार ४ मे वरुथिनी एकादशी साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. याचा सकारत्मक परिणाम तुमच्या लव लाईफवरसुद्धा होणार असल्याचे शास्त्र सांगते. आज सायंकाळी ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत चंद्र कुंभ राशीत असेल. परंतु त्यांनंतर चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. या भ्रमणाने शुभ योग तयार होत आहे. पाहूया या शुभ योगमुळे कोणत्या राशींची लव लाईफ सुधारणार आहे.

मेष

आजच्या त्रिपुष्कर शुभ योगचा मेष राशीसाठी चांगला फायदा होईल. प्रेमीवीरांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आणि आनंददायी असणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल. मैत्रीपूर्ण, प्रेमळ गप्पा होतील. तुमचा मूड रोमँटिक असेल. मात्र तुम्हाला जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. त्यांना भावनिक आधार द्यावा लागेल. जोडीदारासोबत जुने मतभेद संपून नाते अधिक घट्ट होईल. नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडाल. जोडीदारासोबत भविष्याची स्वप्ने पाहाल.

कर्क

आज विरुथिनी एकादशी दिवशी जुळून आलेल्या शुभ योगांचा फायदा कर्क राशीलासुद्धा होणार आहे. कर्क राशी आज प्रेमाच्या बाबतीत जास्तच नशीबवान असेल. तुमची लव लाईफ अतिशय आनंदी राहील. जोडीदारासोबत येणाऱ्या भविष्याविषयी योजना आखण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. लग्नासंबंधी बोलणी होईल. जोडीदारासोबत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यांच्याकडून जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत होईल. या प्रवासात तुमचे नाते आणखी मजबूत होईल. एकमेकांना समजून घेण्याची चांगली संधी आहे.

तूळ

जोतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेमाच्याबाबतीत अनुकूल असणार आहे. जोडीदारासोबत प्रेमळ गप्पा होतील. यातून एकमेकांच्या आणखीन जवळ येण्याची संधी मिळेल. तुमच्या नात्यात सामंजस्य आणि प्रेम असेच राहील. एकमेकांना अडचणीच्या काळात आधार द्याल. जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव कराल. विवाहित जोडप्याला मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल. विवाहित पुरुषांचा पत्नीसोबत रोमँटिक मूड राहील. पतीची भावनिक साथ मिळेल. रागावर नियंत्रण ठेवल्याने नाते आणखी घट्ट होईल.

मीन

ग्रह नक्षत्रांच्या बदलामुळे जे सकारत्मक बदल घडून येत आहेत, त्याचा फायदा मीन राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. मीन राशीची लव लाईफ आज चांगली असणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल. काही लोकांच्या लग्नाचा योग जुळून येत आहे. तुमच्यासाठी हे वैवाहिक आयुष्य भरपूर सुखसमृद्धी घेऊन येईल. आज जोडीदारासोबत घालवलेले क्षण नेहमीच खास राहतील. तसेच जोडीदारासोबत सुंदर ठिकाणी प्रवास करण्याचा योग जुळून येईल. तुमच्यातील नाते अधिक मजबूत होईल.

Whats_app_banner