Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला जुळून आला नवमपंचम योग! 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, मिळणार मानसन्मान
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला जुळून आला नवमपंचम योग! 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, मिळणार मानसन्मान

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला जुळून आला नवमपंचम योग! 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, मिळणार मानसन्मान

Published Jul 17, 2024 02:54 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 Navpancham Yog : आज आषाढी एकादशी दिवशी सूर्य आणि चंद्राच्या संयोगातून नवमपंचम योग जुळून आला आहे.

आषाढी एकादशीला जुळून आला नवमपंचम योग
आषाढी एकादशीला जुळून आला नवमपंचम योग

आज हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असणाऱ्या आषाढी एकादशीचा दिवस आहे. आषाढी एकादशीला प्रचंड महत्व आहे. खासकरून वारकरी समाजात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. विठूमाऊलीला समर्पित असणारा आषाढी एकादशीचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान आजच्या दिवसाचे ज्योतिषीय महत्वसुद्धा आहे. कारण आज आषाढी एकादशी दिवशी सूर्य आणि चंद्राच्या संयोगातून नवमपंचम योग जुळून आला आहे. आज चंद्र मंगळची राशी असणाऱ्या वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या घरात विराजमान असणार आहेत. त्यामुळे नवमपंचम योगाची निर्मिती होत आहे. या योगाचा शुभ प्रभाव राशीचक्रातील काही राशींवर पडणार आहे. नवमपंचम योगात लाभ मिळणाऱ्या राशी नेमक्या कोणत्या आहेत. ते आपण जाणून घेऊया.

वृषभ

आजच्या नवमपंचम योगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. या योगात तुमच्या बौद्धिक क्षमतेत प्रचंड वाढ होईल. तुमची निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईलजे . विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळेल. उद्योग-व्यवसायात चांगला आर्थिक नफा होईल. नोकरदार वर्गाला दुसऱ्या कंपनीमधून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळेल. आर्थिक आवक वाढेल. त्यातून उत्पन्नात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी असणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आज हातून धार्मिक कार्य घडतील. वडिलोपार्जित संपत्तीमधून धनलाभ होईल. डोक्यावरील कर्ज फिटतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. नोकरदारवर्गाला प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित मार्गाने धनलाभ घडून येतील.

धनु

आजच्या नवमपंचम योगाचा फायदा धनु राशीच्या लोकांना होणार आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या कामांना अचानक गती मिळेल. महत्वाच्या कार्यात कुटुंबाची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रातून चांगला धनलाभ होईल. आर्थिक चणचण दूर होईल. घरात सुखसमृद्धी येईल. महागड्या वस्तूंची खरेदी करण्याचा योग आहे. वैवाहिक आयुष्यात समाधान देणाऱ्या गोष्टी घडतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मीन

आज आषाढी एकादशीला जुळून आलेल्या नवमपंचम योगाचा शुभ परिणाम मीन राशीच्या लोकांवर होणार आहे. या योगात तुम्हाला तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल. नोकरीत नव्या संधी पदरात पडतील. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. धनलाभाचे विविध मार्ग खुले होतील. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदारासोबत डिनर डेटवर जाण्याची योजना आखाल. एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला दिवसभर जाणवत राहील.

Whats_app_banner