मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ashadha : आषाढ महिन्यात राशीनुसार करा 'हे' कार्य! अडचणी होतील दूर, घरी नांदेल सुखसमृद्धी

Ashadha : आषाढ महिन्यात राशीनुसार करा 'हे' कार्य! अडचणी होतील दूर, घरी नांदेल सुखसमृद्धी

Jun 25, 2024 01:54 PM IST

Ashadha 2024 What To Do According Rashi : येत्या ६ जुलैपासून आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत आषाढ महिना असेल. आषाढ महिन्यात राशीनुसार काय कार्य करावे ते जाणून घ्या.

आषाढ महिन्यात राशीनुसार काय करावे
आषाढ महिन्यात राशीनुसार काय करावे

हिंदू धर्मात विविध सणउत्सव साजरे केले जातात. प्रत्येक महिन्याला एखादा तरी सण आवर्जून असतोच असतो. पंचांगानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याचे एक वेगळे वैशिष्ठय आहे. प्रत्येक महिना एखाद्या तरी देवी-देवतांना समर्पित करण्यात आला आहे. त्यातीलच एक महत्वाचा महिना म्हणजे आषाढ होय. हिंदू कॅलेंडरनुसार असणारा चौथा महिना म्हणजे आषाढ महिना होय. येत्या ६ जुलैपासून आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत आषाढ महिना कायम असेल. त्यांनंतर ५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु होईल.

आषाढ महिना हिंदू धर्मात अत्यंत शुभ समजला जातो. या महिन्यात साजरे केले जातात. याच महिन्यात मान्सूनची चाहूल लागते. आषाढ महिना भगवान विष्णूसाठी अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात विष्णू देवाची आराधना केली जाते. महाराष्ट्रात यात महिन्यात वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक महिन्यानुसार कोणत्या राशीने कोणते कार्य करावे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आज आपण आषाढ महिन्यात राशीनुसार काय कार्य करावे ते पाहणार आहोत. हे कार्य केल्याने त्या राशींना विष्णू देवाचा आशीर्वाद लाभतो आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदते.

मेष

वैदिक शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णु सहस्रनामाचा पाठ करावा. असे केल्याने विष्णूदेव प्रसन्न होतात.

वृषभ

आषाढ महिन्यात वृषभ राशीच्या लोकांनी लहान मुलींना साखर किंवा साखरेचे पदार्थ दान करावे. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते. तसेच तुमच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात गायीला हिरव्या मुगाची डाळ खाऊ घालावी. यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधित असलेल्या समस्या दूर होतात. आणि सुखसमृद्धी प्राप्त होते.

कर्क

आषाढ महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी बेलपत्र एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवावे. महिना संपताच ते एखाद्या नदीत सोडून द्यावे. असे केल्याने तुमच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर होतील. तुम्हाला विष्णू देवाचा आशीर्वाद लाभेल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात लाल रंगाचे चंदन कपाळावर लावावे. त्यामुळे त्यांना भाग्याची साथ मिळते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात पक्ष्यांना गहू खाऊ घाला. त्यामुळे पितृ प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद लाभेल.

तूळ

आषाढ महिन्यात तूळ राशीच्या लोकांनी देवी भगवतीला मसूर डाळ अर्पण करावी. त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात महिनाभर सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा.

धनु

धनु राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात मंदिरात जाऊन पूजा आराधना करावी. अशाने तुमचे वैवाहिक आयुष्य सुखकर होईल. घरात आनंदी वातावरण राहील.

मकर

मकर राशींच्या लोकांनी आषाढ महिन्यात मंदिरात जाणून भगवान विष्णूला अशोक वृक्षाच्या पानांची माळ अर्पित करावी. त्याने विष्णूदेव प्रसन्न होतील.

कुंभ

आषाढ महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी गरजू-गरीब लोकांमध्ये मिठाईसारख्या गोड पदार्थांचे वाटप करावे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मीन

मीन राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात तांब्याच्या तांब्यामध्ये गहू भरुन ते एका लाल कापडामध्ये झाकून ठेवावे. आणि नंतर ते कुणाला तरी दान करावे.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

WhatsApp channel
विभाग