मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  April Festivals 2023 : कामदा एकादशी ते अक्षय्य तृतीया, एप्रिल महिन्यात हे आहेत सण उत्सव

April Festivals 2023 : कामदा एकादशी ते अक्षय्य तृतीया, एप्रिल महिन्यात हे आहेत सण उत्सव

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 28, 2023 12:50 PM IST

Festivals In April 2023 : एप्रिल महिन्याच्या सण उत्सवांची यादी जर तुम्हाला हवी असेल तर मग हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. एप्रिल २०२३ हा महिना चैत्रानंतर येणाऱ्या वैशाख वणव्याची चाहूलही लावेल.

एप्रिल महिन्याचे सण उत्सव
एप्रिल महिन्याचे सण उत्सव (हिंदुस्तान टाइम्स)

इंग्रजी कॅलेंडरचा चौथा महिना अर्थात एप्रिल २०२३ ला उजाडायला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. अशात एप्रिल महिन्याच्या सण उत्सवांची यादी जर तुम्हाला हवी असेल तर मग हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. एप्रिल २०२३ हा महिना चैत्रानंतर येणाऱ्या वैशाख वणव्याची चाहूलही लावेल. या महिन्यात एकंदरीत १२ दिवस असे आहेत ज्यांना हिंदू सण उत्सवात अपार महत्व आहे. याच महिन्याची सुरूवात आपण कामदा एकादशीने करणार आहोत. महिन्याच्या मध्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण उत्साहात साजरी करणार आहोत. तर महिन्याचा शेवट हा अक्षय्य तृतीयेनं आणि सीता नवमीनं करणार आहोत. या महिन्यातल्या सण उत्सवांची रेलचेल कशी असेल चला पाहूया.

१ एप्रिल, शनिवार, कामदा एकादशी 

४ एप्रिल, मंगळवार, महावीर जयंती 

५ एप्रिल, बुधवार, चैत्र पौर्णिमा 

६ एप्रिल, रविवार, हनुमान जयंती 

९ एप्रिल, रविवार संकष्ट चतुर्थी

१४ एप्रिल, शुक्रवार, बाबासाहेब आंबेडकर जयंती

 १६ एप्रिल, रविवार, वरुथिनी एकादशी 

२२ एप्रिल, शनिवार, अक्षय तृतीया

 २२ एप्रिल, शनिवार, परशुराम जयंती 

२३ एप्रिल, रविवार, विनायक चतुर्थी

२७ एप्रिल, गरुवार, गंगा सप्‍तमी

२९ एप्रिल, शनिवार, सीता नवमी

वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला आपण अक्षय्य तृतीया म्हणून संबोधतो. अक्षय्य तृतीयेला केलं गेलेलं दान अखंड टिकतं असं सांगितलं जातं. म्हणून, या दिवशी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो. त्याचप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला मुहूर्त म्हणून सोने खरेदीला लोकं गर्दी करतात. या प्रसंगी काही मंगल सोहळेही आयोजित केले जातात. यंदा वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी शनिवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ०७.४९ पासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिल २०२३ रोजी ०७ वाजून ४७ मिनिटांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त संपेल. 

 

 

 

WhatsApp channel

विभाग