हिंदू धर्मात विविध चालीरितींना विशेष महत्व आहे. प्रत्येक कार्य हे या चालीरितींना अनुसरुनच केले जाते. त्याप्रमाणेच हिंदू धर्मात अंकभविष्यालासुद्धा अतिशय महत्व प्राप्त आहे. अंकभविष्याच्या माध्यमातून धर्माबाबत अनेक वैशिष्ट्ये संबोधित करण्यात आलेली आहेत. या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून या धर्माची ऐतिहासिकता आणि विशेषतः दिसून येते. अंकभविष्यात चार या अंकाबद्दल विशेष स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चार हा अंक केवळ अंक नसून हिंदू धर्मातील संस्कृती, अध्यात्म आणि सिद्धांतांचे प्रतीक आहे. त्यामुळेच चार या अंकाला शास्त्रात इतके महत्व का आहे याचा खुलासा अंक भविष्यात करण्यात आला आहे.
जोतिष अभ्यासानुसार, हिंदू धर्मात या जगाला चार खंडांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. सत्ययुग, त्रेत्रायुग, द्वापर युग आणि चौथा म्हणजे आता सुरु असलेला कलयुग होय.आणि इथूनच हिंदू धर्मात चार या अंकाला विशेष महत्व प्राप्त झाले आहेत.
त्यांनंतर पुढे हिंदू धर्माचा अर्थ सांगणारे चार महत्वाचे वेदसुद्धा चार भागांत विभागलेले आहेत. यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा समावेश होतो.
१) ऋग्वेद- शास्त्रानुसार ऋग्वेद वेदात हिंदू धर्मातील सर्व महत्वाच्या मंत्रांचा आणि देवी-देवतांचा उल्लेख आहे.
२)यजुर्वेदात यज्ञ आणि विधींसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व मंत्रांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
३)सामवेद- सामवेदात गायन आणि संगीत रुपात देवतांची स्तुती करणारे मंत्र समाविष्ट करण्यात आले आहेत.
४)अथर्ववेद- अथर्ववेदात आजारांवर उपचार, जादूटोण्यावर उपाय सांगणारे विविध मंत्र सांगण्यात आले आहेत.
त्यानंतर हिंदू धर्मात चार नितींचादेखील प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. तुम्ही लहानपणासून ऐकत आलेल्या साम-दाम-दंड-भेद या चार निती आहेत.
१) साम म्हणजे संवाद साधून त्यातून मार्ग काढणे आणि व्यवहार पुढे चालवणे.
२)दाम म्हणजे ज्या कार्यात संवादाने काम होत नाही तिथे धनाचा आधार घ्यावा.
३)दंड म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्या शारीरिक ताकतीचा वापर करणे.
४)भेद म्हणजे एखाद्या गोष्टीत विभाजन करुन लक्ष्य साध्य करणे.
सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू धर्मात चार धाम यांचा उल्लेख करण्यात आला आहे. विष्णू देवाच्या संबंधित असलेले हे चार धाम प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचे समजले जातात. हे पवित्र स्थळ चार दिशांमध्ये स्थित आहेत.
१) उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ हे उत्तर दिशेला असलेले महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.
२)तामिळनाडूत रामेश्वरम दक्षिण दिशेला स्थित आहे.
३)ओडिसामध्ये असलेले जगन्नाथपुरी हे स्थळ पूर्व दिशेला स्थित आहे.
४) गुजरातमध्ये असलेले द्वारका हे उत्तर दिशेला स्थित आहे.
यामध्ये चार पुरुषार्थचादेखील समावेश करण्यात आला आहे. शास्त्रानुसार, चार पुरुषार्थ माणसाच्या आयुष्याचा खरा सार सांगतात. यामध्ये धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष असे भाग पडतात.
वैदिक शास्त्रानुसार हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट चार विभागात विभाजित करण्यात आली आहे. त्यामुळे चार या अंकाला विशेष महत्व प्राप्त आहे. कोणत्याही कार्यात चार हा आकडा अतिशय शुभ समजला जातो.
संबंधित बातम्या