मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology Prediction : नाते टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात 'या' जन्मतारखेचे लोक! कधीच सोडत नाहीत साथ

Numerology Prediction : नाते टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात 'या' जन्मतारखेचे लोक! कधीच सोडत नाहीत साथ

May 26, 2024 11:48 AM IST

Numerology Prediction : अंकशास्त्रात १ ते ९ असे मूलांक असतात. यामध्ये प्रत्येक मूलांकानुसार व्यक्तींचे स्वभावगुण सांगितले जातात. या मूलांकाचे लोक नेहमीच स्वतःला त्रास करुन घेऊन इतरांसोबतचे नाते जपण्याचा प्रयत्न करतात.

कोणत्या जन्मतारखेचे लोक नाते टिकवतात
कोणत्या जन्मतारखेचे लोक नाते टिकवतात

जोतिष शास्त्रात भविष्य सांगण्यासाठी अंकभविष्य हे एक महत्वाचे माध्यम आहे. अंकभविष्याला संख्याशास्त्र, अंकशास्त्र किंवा न्यूमरॉलॉजी असेही म्हटले जाते. यामध्ये मूलांकांच्या आधारे लोकांच्या भविष्याचा अंदाज बांधला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन हा मूलांक निश्चित केला जातो. उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची २७ तारीख असेल तर तुमचा मूलांक ९ असतो. अर्थातच तुमच्या जन्मतारखेच्या बेरजेलाच मूलांक असे संबोधतात. अंकशास्त्रात १ ते ९ असे मूलांक असतात. यामध्ये प्रत्येक मूलांकानुसार व्यक्तींचे स्वभावगुण सांगितले जातात.

अंक भविष्यात २ या अंकाला विशेष महत्व आहे. कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. २ या मूलांकांचे लोक अतिशय मनमिळाऊ, दयाळू, भावुक आणि विश्वासू असतात. या मूलांकांचे लोक नातेसंबंध जपण्यात नेहमीच पुढे असतात. हे लोक नेहमीच स्वतःला त्रास करुन घेऊन इतरांसोबतचे नाते जपण्याचा प्रयत्न करत असतात.

२, ११, २०, २९ या तारखेला जन्मलेले लोक शांतताप्रिय आणि धैर्यशील वृत्तीचे असतात. या लोकांना तापटपणा अजिबात रुचत नाही. या मूलांकाचे लोक अडचणीच्या काळात आपला संयम ढासळू देत नाहीत. कोणत्याही कठीण प्रसंगातून अतिशय धैर्याने आणि बौद्धीक चातुर्याने बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याची योग्य रुपरेषा आखणे यांना पसंत असते. तसेच एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. इतरांसोबत ताळमेळ ठेवणे यांना अतिशय सोपे जाते. त्यामुळे नेहमीच लोक यांच्याकडे आकर्षित होतात.

या मूलांकाचे लोक अतिशय रचनात्मक आणि कलात्मक असतात. त्यामुळेच हे लोक कला, संगीत, लेखन अशा क्षेत्रांमध्ये प्रभावी काम करतात. या लोकांनी एखादे काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे लोक विश्वासू आणि भावनिक असतात. त्यामुळेच एखादे वचन दिल्यास ते पूर्णत्वास नेतात. यांच्याकडून केलेली अपेक्षा पूर्ण करण्यात हे नेहमीच यशस्वी ठरतात.

मात्र मूलांक २ असणाऱ्या लोकांची निर्णयक्षमता अतिशय कमकुवत असते. या लोकांना एखाद्या गोष्टीत पटकन निर्णय घेणे शक्य होत नाही. निर्णय घेताना सतत यांचे विचार बदलतात. त्यामुळे त्यांच्या हातातून चांगल्या संधी निसटून जाण्याची शक्यता असते. या लोकांना आपल्या निर्णयांवर शंका वाटत असते. या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यामुळेच हे लोक लहानसहान गोष्टींवरुन चिंताग्रस्त होत असतात.

WhatsApp channel
विभाग