मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Wednesday Numerology : बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी लकी? वाचा अंकभविष्य

Wednesday Numerology : बुधवारच्या दिवशी कोणता अंक आणि रंग तुमच्यासाठी लकी? वाचा अंकभविष्य

May 29, 2024 11:33 AM IST

Wednesday Numerology Prediction : ज्याप्रकारे राशीभविष्यात राशींवरुन अंदाज बांधले जातात. त्याचप्रकारे या शास्त्रात मूलांकावरून भविष्याचे अंदाज बांधले जातात.

अंकज्योतिष, अंकभविष्य
अंकज्योतिष, अंकभविष्य

राशीभविष्याप्रमाणे अंकभविष्यसुद्धा तितकेच प्रभावी असते. त्यामुळेच अनेक लोक दैनंदिन आयुष्यात कोणतेही कार्य करताना अंकशास्त्राचा आधार घेतात. अंकशास्त्रात तुमच्या भविष्यासोबतच तुम्हाला कोणता रंग आणि अंक लाभदायक ठरु शकतो याबाबतही सांगितले जाते. ज्याप्रकारे राशीभविष्यात राशींवरुन अंदाज बांधले जातात. त्याचप्रकारे या शास्त्रात मूलांकावरून भविष्याचे अंदाज बांधले जातात. तुमच्या जन्म तारखेवरुन हा मूलांक ठरत असतो. आज बुधवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आणि कोणता अंक किंवा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल हे मूलांकाच्या आधारे जाणून घेऊया.

मूलांक १

आजचा दिवस मूलांक १ च्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आलेल्या अडचणी दूर होतील. व्यापार-उद्योगात प्रगती होईल. आज केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात दुप्पट फायदा मिळणार आहे.

शुभ अंक-११

शुभ रंग-हिरवा

मूलांक २

मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज आर्थिकदृष्ट्या भरभराटीचा दिवस आहे. आज मानसिक स्वास्थ्य मात्र काही प्रमाणात बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आज चांगला वेळ घालवाल. नाते आणखी दृढ होईल.

शुभ अंक-४

शुभ रंग-भगवा

मूलांक ३

आजचा दिवस मूलांक ३ असणाऱ्या लोकांसाठी समाधानकारक असणार आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अडलेली कामे पूर्णत्वास न्याल. काही लोकांना सरकारी नोकरीचा प्रस्ताव येईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय असेल.

शुभ अंक-९

शुभ रंग-पांढरा

मूलांक ४

मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. आज तुमचे पैसे एखाद्या ठिकाणी अडकू शकतात. त्यामुळे थोडासा मनस्ताप होईल. नोकरीच्या ठिकाणी मतभेद उद्भवू शकतात. त्यामुळे आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.

शुभ अंक-८

शुभ रंग-आकाशी रंग

मूलांक ५

आज मूलांक ५ च्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे. आज हातात घेतलेली सर्व कामे विनाअडथळा पूर्ण होतील. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. व्यवसायात प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील. आर्थिक कमाईचे स्तोत्र वाढतील.

शुभ अंक-५१

शुभ रंग-पिवळा

मूलांक ६

मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. आज आर्थिक चणचण भासेल. प्रगतीच्या संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. मानसिक अस्थिरता लाभेल. एखाद्याकडून घेतलेल्या मदतीचा विपरीत परिणाम मिळेल. मित्रांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राग करणे टाळा.

शुभ अंक-२६

शुभ रंग-निळा

मूलांक ७

आजचा दिवस मूलांक ७ साठी अनुकूल असणार आहे. आज आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. कामाच्या ठिकाणी केलेल्या कार्याचे कौतुक होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांच्या नजरेत याल.

शुभ अंक-१४

शुभ रंग-लाल

मूलांक ८

आजचा दिवस मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज आर्थिक स्थिती फारशी उत्तम नसेल. आजच्या दिवशी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. आज तुम्हाला जुने आजार नव्याने उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या.

शुभ अंक-४

शुभ रंग-हिरवा

मूलांक ९

मूलांक ९ च्या लोकांना आज भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या लाभ देणाऱ्या घटना घडतील. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने तुमची मानसिक स्थिती उत्तम राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना बनवू शकता.

शुभ अंक-१२

शुभ रंग-भगवा

WhatsApp channel
विभाग