मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology Horoscope Today : या 3 मूलांकांच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस! वाचा आजचे अंकभविष्य

Numerology Horoscope Today : या 3 मूलांकांच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस! वाचा आजचे अंकभविष्य

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2024 01:32 PM IST

Numerology Horoscope Today 10 May 2024: आज मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, रवी योग यांसारखे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम अंकशास्त्रावरसुद्धा होणार आहे.

Numerology horoscope
Numerology horoscope

Numerology Horoscope Today 10 May 2024:अंकजोतिषशास्त्रानुसार आज शुक्रवार १० मे २०२४ रोजी बुधादित्य योगाची निर्मिती होत आहे. तसेच साडेतीन शुभ मुहूर्तामधील अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्तसुद्धा आहे. तसेच आज मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, रवी योग यांसारखे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम अंकशास्त्रावरसुद्धा होणार आहे. मूलांक १ ते ९ मध्ये कोणत्या योगाचा कसा परिणाम होणार हे जाणून घेऊया.

मूलांक १

मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल असणार आहे. पैशांसंबंधी सुरु असलेल्या अडचणी आज संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहेत. अचानक धनलाभ झाल्याने मन प्रसन्न राहील. आज कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अथवा पोटासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )

शुभ अंक-११

शुभ रंग-पिवळा

 

मूलांक २

मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. एखाद्या गोष्टीत आर्थिक गुंतवणूक केल्यास दुप्पट फायदा मिळू शकतो. हातात पैसा असल्याने मन आनंदी आणि शांत राहील. कुटुंबासोबत आज आनंदाचे क्षण घालवाल. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)

शुभ अंक-८

शुभ रंग-चॉकलेटी

 

मूलांक ३

मूलांक ३ च्या लोकांना आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा स्नर आहे. आज काहीसा मानसिक तणाव जाणवेल. मात्र आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस फायदेशीर आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना आर्थिक उलाढाली करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. अथवा डोकेदुखीने दिवसभर त्रस्त राहाल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)

शुभ अंक-१

शुभ रंग-हिरवा

Lucky Zodiac Signs : अक्षय तृतीयेला या ५ राशींवर होणार धनवर्षाव! पाहा आजच्या लकी राशी

मूलांक ४

मूलांक ४ असणाऱ्या लोकांना आजचा दिवस उत्तम असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुम्हाला फायदेशीर असेल. अनेक दिवसांपासून अडकून असलेले पैसे आज परत मिळतील. उद्योग-व्यापारात धमलाभ होईल. कामानिमित्त परदेशवारी घडून येईल. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)

शुभ अंक-८

शुभ रंग-पांढरा

 

मूलांक ५

मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. आज कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. नवीन व्यवसाय सुरु करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)

शुभ अंक- १०

शुभ रंग-निळा

 

मूलांक ६

मूलांक ६ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरदारवर्गाचे ऑफिसकामात कौतुक होईल. तुमच्या कला कौशल्याने इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)

शुभ अंक-३

शुभ रंग-लाल

Today Horoscope 10 May 2024 : अक्षय तृतीयेदिवशी कुणाचे नशीब सोन्यासारखे झळाळणार? वाचा आजचे राशीभविष्य

मूलांक ७

मूलांक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज प्रत्येक गोष्टींचा विचार तुम्ही कलात्मक आणि अध्यात्मिकरित्या कराल. हातात घेतलेल्या कामातून धनलाभ होईल. घरात अचानक पैसे आल्याने वातावरण आनंदी राहील. जोडीदारोसबत मनमोकळेपणाने संवाद साधला जाईल. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)

शुभ अंक-३

शुभ रंग-पिवळा

 

मूलांक ८

मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस प्रतिकूल आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत-जास्त वेळ घालवाल.

(कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)

शुभ अंक-३

शुभ रंग-भगवा

 

मूलांक ९

मूलांक ९ च्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभकारक असणार आहे. दिवसभर मनाप्रमाणे कामे झाल्याने मन उत्साही राहील.

कोणत्याही व्यवसायात वडिलांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास फायदा होईल. अचानक धनप्राप्ती झाल्याने आत्मविश्वास वाढेल. आजच्या दिवशी नोकरदारवर्गाला वेतनवाढ मिळू शकते. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)

शुभ अंक-६

शुभ रंग-गुलाबी

WhatsApp channel

विभाग