Numerology Predictions : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रानुसारही लोकांचे गुणवैशिष्ट्य आणि स्वभावाचे वर्णन केले जाते. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या जन्मतारखेच्या गणनेनुसार एक भाग्यांक मिळतो आणि हाच त्या व्यक्तिचा मूलांक असतो.
अंकशास्त्रात काही मूलांकासाठी असे म्हटले जाते की, या भाग्यांक असलेल्या लोकांकडे खूप पैसा राहतो आणि त्यांना चांगले यश मिळते. त्यांच्या शासक ग्रहाद्वारे मूलांक संख्येसाठी बऱ्याच गोष्टी निश्चित केल्या जातात. ज्या मूलांकाचा स्वामी ग्रह सूर्य, राहू, मंगळ आणि शुक्र आहेत त्यांच्यात नेतृत्व, योग्य निर्णय घेणे आणि आपल्या शब्दावर ठाम राहणे असे गुण असतात, त्यामुळे या लोकांना नेहमी यश मिळते.
जर तुमची जन्मतारीख १, १०, १९, २८ असेल तर तुमचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि तुमचा भाग्यांक १ आहे. मूलांक १ चा स्वामी सूर्य असल्यामुळे हे लोक नेतृत्वात पुढे जातात आणि यश मिळवतात. यशस्वी होणे त्यांच्यासाठी खूप साहजिक आहे, त्यांना पुढे जाण्यासाठी फार कमी आधाराची गरज आहे. खरे तर सूर्य स्वामी असल्यामुळे हे शक्य झाले आहे.
जर तुमची जन्मतारीख ४, १३, २२, ३१ असेल तर तुमचा स्वामी ग्रह राहू आहे. राहूचा संबंध मानसिक शक्तीशी आहे. जर राहु तुमच्यासाठी चांगला असेल तर हा मूलांक असलेल्या लोकांच्या मानसीक शक्तीवर सकारात्मक प्रभाव राहतो. हे लोक अशा गोष्टी समजून घेण्यास सक्षम असतात ज्या इतर लोकांना समजू शकत नाहीत. या व्यतिरिक्त जर या लोकांनी कठोर परिश्रम घेतले आणि मनाच्या बळावर अनेक गोष्टी केल्या तर या लोकांना यश आणि पैसा दोन्ही मिळतात.
जर तुमची जन्मतारीख ९, १८, २७ असेल तर या मूलांकाच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. करा किंवा मरा असा या लोकांचा दृष्टिकोन असतो. याशिवाय हे लोक जो काही निर्णय घेतात, त्यात यशस्वीरीत्या पुढे जातात.
जर तुमची जन्मतारीख ५, १४, २३ असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. या मूलांकाचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध हा तुमचा स्वामी असल्यामुळे, अनेक वेळा तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागते, परंतु लवकरच तुम्हाला प्रसिद्धी, यश आणि पैसा सर्व मिळते.