तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ९ असेल तर तुमचा मूलांक ९ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ९ चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळवार ९ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आजचा दिवस मिळता-जुळता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिकरीत्या नियोजन करून कार्य करा आणि दुसरा पर्याय तयार ठेवा. आर्थिक स्थिती चांगली राहील.
व्यावसायिक जीवन टंगळ-मंगळ आहे. यामुळे तुम्हाला लक्षपूर्वक काम करण्याची गरज आहे, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कुटूंबातील वातावरण मंगलमय राहील. प्रेम जीवन चांगले राहील.
प्रेमजीवनात तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवावा. यामुळे नात्यात जवळीक निर्माण होईल. तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकतात. व्यावसायिक जीवन आव्हानात्मक राहील.
वडीलोपार्जीत संपत्ती मिळू शकते. कौटुंबीक जीवन दृढ आहे, प्रेमजीवन रोमॅंटीक राहील. आजचा दिवस शुभ आहे, त्यामुळे गुंतवणूक करू शकतात. व्यवसायात कष्ट करावे लागतील.
मालमत्ता खरेदी करण्याचे नियोजन करत असाल तर त्यासाठी शुभ संधी आहे. व्यावसायिक पद्धतीने सर्व व्यवस्थित करावे लागेल. कुटूंबात तुमच्या शब्दाला मान राहील. गुंतवणूकीचा जास्तीत जास्त लाभ घ्या.
तुमच्याकडे एखादे नियोजन असेल तर त्यासंबंधी चौफेर विचार करून घ्यावा. कार्यक्षेत्रात राजकारणापासून लांब राहा, व्यावसायिकदृष्ट्या सावध राहा. आर्थिक स्थिती चांगली राहील. सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता मिळेल.
काही गोष्टींचा त्रास होईल. व्यस्त दिवस राहील, व्यस्त दिवस असल्यामुळे ताण-तणाव वाटेल. सायंकाळी थोडा आराम मिळेल. कुटूंबासंबंधी आव्हानात्मक दिवस राहील, थोडा संयम ठेवावा.
आजचा दिवस चढ-उताराचा राहील, आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील. आज तुम्ही जास्त ऊर्जात्मक व उत्साही असाल. तुमचे प्रेम जीवनही प्रेममय राहील.
कुठे फिरायला जाणार असाल, तर एखाद्या त्रासाला सामोरे जावे लागेल. घरातही निकडीचा प्रसंग घडू शकतो. खर्च करण्याची गरज भासू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)