मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार मराठी नववर्षाचा पहिला दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार मराठी नववर्षाचा पहिला दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 09, 2024 11:54 AM IST

Ank Bhavishya 9 april 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रारंभचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य ९ एप्रिल २०२४, अंकज्योतिष
अंकभविष्य ९ एप्रिल २०२४, अंकज्योतिष

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ९ असेल तर तुमचा मूलांक ९ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ९ चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळवार ९ एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

आज तुमचा अडकलेला पैसा अचानक मिळेल. जर तुम्ही क्रीडा जगताशी निगडीत असाल तर आज तुम्हाला सन्मानित केले जाऊ शकते. आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मूलांक २- 

तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात अति भावनीक होऊन निर्णय घेऊ नका, तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक करा. आज तुमच्याकडे पैसाही येत राहील. आजचा दिवस कुटुंबीयांसह खूप चांगला जाईल.

मूलांक ३- 

आज तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त सकारात्मक व्हाल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घेतलेल्या प्रत्येक निर्णयात कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुमच्यासोबत असेल. तुमचा जोडीदार प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत उभा असलेला दिसेल.

मूलांक ४- 

तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबातील सदस्यांशी कोणतेही नकारात्मक संभाषण टाळा, अन्यथा ते तुमच्या व्यवसाय आणि नोकरीसाठी चांगले ठरणार नाही. असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक ५- 

आजचा दिवस ठिक-ठाक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचा वेळ चांगला जाईल. आज तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यामुळे आज शांत राहा आणि सौम्य भाषा वापरा. तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.

मूलांक ६- 

आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होईल. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत काही मनोरंजनाची योजना आखू शकता. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक ७- 

आज तुम्ही तुमचे मत कोणाकडेही व्यक्त करणे टाळाल. आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांसह सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या आवडीचे काहीतरी खायला द्यावे. तुमच्या अडचणीतही मान-सन्मान कायम राहण्यास मदत होईल.

मूलांक ८- 

आज कुठेही पैसे गुंतवणे टाळा. आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करा कारण आजचा तुमचा दिवस कुटुंबासोबत छान जाईल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेत असाल.

मूलांक ९- 

तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. अडकलेले पैसे अचानक मिळतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि हा आनंद तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर कराल. तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकता.

WhatsApp channel

विभाग