वैदिक शास्त्रामध्ये अंकशास्त्राला विशेष महत्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुम्हाला आजचा दिवस कसा जाणार?फायदा होणार की नुकसान? याबाबत पूर्व कल्पना देण्यात येते. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे संबोधतात. या मूलांकावरूनच तुमच्या भविष्यातील घडामोडींचा वेध घेतला जातो. बुधवार ८ मे २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्व बाबतीत आजचा दिवस कसा जाईल, पाहूया प्रत्येक मूलांकाच्यादृष्टीने आजचे अंकभविष्य काय सांगते.
मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे विविध मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अभ्यासात विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. महत्वाच्या निर्णयांमध्ये वडिलांचा आधार मिळेल. त्यामुळे मन उत्साही राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक-११
शुभ रंग- पिवळा
मूलांक २ च्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. दिवसभर मन प्रसन्न राहील. आयुष्यात आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्कारिक सिद्ध होणार आहे. महत्वाचे निर्णय घेताना वडिलांचा सल्ला फलदायी ठरेल. भोजनात गोड पदार्थ खाणे टाळा. मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता आहे. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक-८
शुभ रंग-लाल
मूलांक ३ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल. घरामध्ये मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. आर्थिक उलाढालींसाठी दिवस शुभ आहे. तुमच्या अभ्यासू बोलण्याने समोरच्या व्यक्ती प्रभावित होऊ शकतात. आज विष्णू देवाची पूजा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-११
शुभ रंग-पिवळा
मूलांक ४ असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सामान्य आहे. आज दिवसभरात भाग्याची साथ फारशी मिळणार नाही. कोणतेही महत्वाचे काम करताना विचारपूर्वक करावे लागेल. अन्यथा मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. कामामध्ये मंद प्रगती होईल. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-१२
शुभ रंग-पिवळा
मूलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आज या लोकांना अनपेक्षितपणे धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. कमाईचे विविध मार्ग खुले होतील. त्यामुळे मनोबल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील गुरुवर आज तुमचा अतोनात विश्वास राहील. मनामध्ये योजलेल्या योजना आज प्रत्यक्षात उतरतील. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-४
शुभ रंग-लाल
मूलांक ६ असणाऱ्या लोकांना आजचा दिवस संमिश्र असले. या मूलांकाच्या व्यक्तींनी आज आपल्या जोडीदारासोबत वादविवाद करु नयेत. एकमेकांना समजावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. तब्येतीची काळजी घ्या. मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. नवीन कामाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-३
शुभ रंग-पांढरा
मूलांक ७ असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज आर्थिक प्रगती उत्तम होईल. त्यामुळे दिवसभर उत्साह जाणवेल. मुलांकडून मिळालेला सल्ला तुमच्या रखडलेल्या कामात फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. आज घरात कुलदैवताची पूजा करणे लाभदायक ठरेल. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक-७
शुभ रंग- पांढरा
मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चत्मकारिक असणार आहे. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर विविध संधी चालून येतील. कामात अडचणी आल्या तरी इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही निभाहून घेऊन जाल. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-४
शुभ रंग-गुलाबी
मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वडीलधाऱ्या माणसांशी वादविवाद करणे टाळा. भावंडांसोबत संवादातून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-७
शुभ रंग-पांढरा