मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा महाशिवरात्रीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा महाशिवरात्रीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 08, 2024 02:06 PM IST

Ank Bhavishya 8 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा शिवपूजनाचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

आजचे अंकभविष्य ८ मार्च २०२४
आजचे अंकभविष्य ८ मार्च २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ८ असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि आहे. शुक्रवार ८ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

सर्व नियोजित कामे आज पूर्ण होतील. जर तुम्हाला एखाद्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस खूप चांगला असेल आणि ही भागीदारी तुमच्यासाठी भविष्यात आर्थिक वृद्धीची शक्यता निर्माण करेल. महाशिवरात्रीमुळे तुम्ही घरातील धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असाल.

मूलांक २- 

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर महाशिवरात्रीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप आनंदी असाल. तुमच्या प्रगतीसाठी विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

मूलांक ३- 

महाशिवरात्रीचा दिवस चांगला जाणार आहे. अत्यंत विवेक बुद्धीने दिवस घालवाल. आर्थिक दृष्टीकोनातून, आजचा दिवस अनुकूल असेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मूलांक ४- 

तुमच्या कामात तुम्हाला अनावश्यक अडथळे येऊ शकतात. तुमची आणि तुमच्या वडिलांची तब्येत थोडी खराब राहू शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता.

मूलांक ५- 

व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल, तुम्ही व्यवसायाची कामे अतिशय हुशारीने पूर्ण कराल, जे तुमच्या नजीकच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीतही आजचा दिवस अनुकूल राहील. जोडीदारासोबत दिवस आनंदात व्यतीत होईल.

मूलांक ६- 

खूप विचारपूर्वक आणि केवळ तज्ञांच्या सल्ल्याने पैसे गुंतवा. नोकरदार लोकांना आज अधिकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. आज तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहा आणि रागावू नका.

मूलांक ७- 

आज तुम्ही स्वभावाने थोडे अहंकारी दिसाल. आज कामाच्या ठिकाणी तुमचा कोणाशी वाद होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक संभाषण टाळा आणि संयमाने काम करा.

मूलांक ८- 

जर तुम्ही घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. याव्यतिरिक्त, तुमच्या जोडीदाराशी तुमचा समन्वय बिघडू शकतो.

मूलांक ९- 

अनावश्यक रागामुळे तुमचे काम बिघडू शकते. नोकरी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. कुटुंबातील सदस्यांशी आज वैचारिक मतभेद होऊ शकतात.

WhatsApp channel

विभाग