मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 08, 2024 12:30 PM IST

Ank Bhavishya 8 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ८ असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि आहे. सोमवार ८ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

मूलांक १ साठी दिवस शुभ आहे. करिअरमध्ये जबाबदारी मिळेल, यामुळे पदोन्नतीचीही शक्यता आहे. मानसिक स्वास्थ सांभाळा. तब्येतिची काळजी घ्या आणि बाहेरचे पदार्थ खाऊ नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक २- 

दिवस व्यस्ततेत जाईल. कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये राजकारणापासून दूर राहा. विचारपूर्वक निर्णय घ्या. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि मानसिक स्वास्थ सांभाळा.

मूलांक ३- 

दिवसभर सकारात्मक वाटेल. एकांकी असणाऱ्यांसाठी दिवस खास आहे. आज तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. कामासंबंधी प्रवासाचे योग आहेत.

मूलांक ४- 

दिवस व्यस्त राहील. आर्थिक बाबतीत सावध राहा, धनसंबंधी बाबतीत सांभाळून व्यवहार करा. कामाचा जास्त ताण राहील. मानसिक स्वास्थ सांभाळा आणि वेळोवेळी ब्रेक घ्या.

मूलांक ५ - 

ताण तणावात्मक दिवस वाटेल. तणावापासून लांब राहण्यासाठी आवडत्या गोष्टीत वेळ घालवा. तुमच्यात प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता आहे. अडचणीवर तोडगा काढताना जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

मूलांक ६- 

प्रेम जीवनात फार बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली राहील. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या. नात्यात फार दुरावा निर्माण झाला असेल तर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी नवीन मार्ग काढा.

मूलांक ७ - 

आर्थिक स्थिती सामान्य राहील. धनलाभाची शक्यता आहे. करिअर जीवनात कामाचा बोजा वाढू शकतो. निरोगी राहा. सिंगल असाल तर मनाने नव्हे तर डोक्याने निर्णय घ्या.

मूलांक ८- 

स्वत:वर प्रेम करण्यावर लक्ष द्या. त्वचेची काळजी घ्याल. कामावर लक्ष केंद्रित करा पण वयक्तिक जीवनावरही लक्ष द्या, संतूलन ठेवा. कुटूंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणं तुमच्यासाठी चांगले राहील.

मूलांक ९- 

जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल. रोमॅंटिक डिनरचे नियोजन कराल. कुटूंबातीस सदस्यास आर्थिक मदत करावी लागेल. सकारात्मक दिवस राहील. बाहेरच पदार्थ खाणे टाळा.

विभाग