मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार शिवरात्रीचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार शिवरात्रीचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Feb 08, 2024 02:20 PM IST

Ank Bhavishya 8 february 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा शिवरात्रीचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology horoscope 8 february 2024
Numerology horoscope 8 february 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ८ असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि आहे. गुरुवार ८ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

महाधनलाभाची अपेक्षा आहे. अनेक मार्गाने पैसा येईल आणि आर्थिक समृद्धी होईल. संपत्ती देणी-घेणी करताना त्याचा खोलवर विचार करा. कार्यक्षेत्रात नवीन सहकाऱ्यांचे कौतुक करा यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल.

मूलांक २- 

आरोग्यात सुधारणा करण्यासाठी केलेला संकल्प लवकरच लाभदायक ठरेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी वाद घालू नका, अडचणीत याल. जर तुम्हाला घरात शात वातावरण हवे असेल तर जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करा आणि त्यांना त्यांचा वेळ द्या.

मूलांक ३- 

आर्थिक बाबतीत अपेक्षेनुसार स्थिती आहे आणि गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. आज तणावमुक्त होण्यात यश मिळेल. चार्टर्ड अकाउंटेंट आणि वकीलांसाठी दिवस चांगला आहे.

मूलांक ४- 

घरातील वातावरण चांगले बनवण्यासाठी तुम्हालाच पर्याय शोधावा लागेल, कुटुंबासोबत कुठे बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल. संपत्ती मिळण्याची इच्छा प्रबळ होऊ शकते, कारण तुमचे आर्थिक स्तर उंचावलेलं आहे.

मूलांक ५- 

आजचा दिवस चांगला आहे. यावेळी तुमच्या संपत्तीतून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा करू शकतात. कमाई जशी वाढेल तशी आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. वजनवाढीच्या अडचणीवर योगा क्लास चांगला फायदा देऊ शकतो.

मूलांक ६- 

काही जणांना रोमांचक आव्हान मिळेल. कुटुंबात एखाद्याच्या लग्नाचे आयोजन घरात आनंदाचे वातावरण घेऊन येईल. नोकरीसंबंधी देश-विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

मूलांक ७- 

कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदवार्ता मिळेल. काही लोकांसाठी देश-विदेश यात्रेचे योग तयार होत आहे. नवीन नाते लग्नाचा संकेत आहे. गरजूची मदत करून तुम्हाला समाधान मिळेल.

मूलांक ८- 

म्यूचुअल फंड आणि काही इतर गुंतवणूकीसाठी चांगला वेळ आहे, भविष्यात चांगला लाभ होईल. व्यावसायिक व वयक्तील जीवनात संतूलन ठेवा.

मूलांक ९- 

विदेशी गुंतवणूकीतून भरपूर नफा मिळवण्यात यश मिळेल. तुम्ही तुमची ऊर्जा आणि लक्ष एखाद्या मोठ्या प्रकल्पावर लावा. गृहिणींना घरातील मंगलकार्यात भाग घ्यावा लागू शकतो. व्यावसायिकांना प्रवासातून एखादी चांगली संधी मिळेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग