Numerology horoscope : जन्मतारखेनुसार हिंदूवर्ष अखेरचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार हिंदूवर्ष अखेरचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार हिंदूवर्ष अखेरचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Published Apr 08, 2024 10:31 AM IST

Ank Bhavishya 8 april 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार सोमवती अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य ८ एप्रिल २०२४, अंकज्योतिष
अंकभविष्य ८ एप्रिल २०२४, अंकज्योतिष

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ८ असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि आहे. सोमवार ८ एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

डोकेदुखीची तक्रार तुम्हाला दिवसभर त्रस्त करू शकते. आज तुम्हाला खूप उत्साही पण वाटेल. बोलण्याच्या पद्धतीत विनम्र राहा, अन्यथा कोणाशी तरी अनावश्यक वाद होईल.

मूलांक २- 

आज खूप आनंद वाटेल कारण आज इच्छित रक्कम मिळू शकते. कुटुंबातील सदस्याच्या असभ्य वर्तनामुळे चिंता वाढू शकते. तुम्हाला तुमचे भाऊ आणि मित्र यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मूलांक ३- 

धार्मिक कार्यात धावपळ वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही शुभ कार्याची योजना देखील करू शकता. आज तुम्ही दिलेला सल्ला खूप प्रभावी ठरेल. उदरनिर्वाहाचा दुसरा मार्गही तुम्ही विचारात घेऊ शकता.

मूलांक ४- 

दिवसभर आपले वर्तन आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यास प्रभावी सिद्ध व्हाल. एखादी चांगली बातमी जीवनात आनंद आणू शकते. आज तुम्हाला इच्छा नसतानाही शिस्तबद्ध राहायला आवडेल आणि या बदलाचा तुम्हाला फायदाही होईल.

मूलांक ५- 

आज तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी संपर्क साधू शकता आणि त्याचा फायदाही होईल. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत अनेक जुन्या आठवणी ताज्या कराल, ज्यामुळे तुम्हाला फार आनंद मिळेल. आरोग्याबाबतही खूप जागरूक असाल, ज्यामुळे तुमच्या जीवनशैलीत चांगले बदल होतील.

मूलांक ६- 

जोडीदाराशी वाद घालू नये. महिलांचा आदर करणे खूप महत्त्वाचे ठरेल.आज तुम्ही काही आवडत्या कपड्यांची खरेदी करू शकता. तुमच्या मित्रांमध्ये तुमचे आकर्षण राहील जे खूप प्रभावी ठरेल.

मूलांक ७- 

आज मनाने घेतलेले निर्णय चांगले बदल घडवून आणतील. काही व्यावसायिक कल्पना व्यक्त करू शकता, जे भविष्यात यशस्वी ठरतील. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे भावूक व्हाल.

मूलांक ८- 

आज तुम्हाला भौतिक सुखात वाढ जाणवेल, परंतु मानसिक तणाव वाढेल. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कामकाजाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्याकडे संशयाने पाहतील.

मूलांक ९- 

आज तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, अन्यथा चालू असलेले काम बिघडेल. आज, प्रत्येक गोष्टीबद्दल स्पष्टपणे बोलण्याची तुमची सवय तुम्हाला अनेक नवीन शत्रू बनवू शकते. आज तुम्ही काही धाडसी निर्णय घ्याल.

Whats_app_banner