तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ७ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. मंगळवार ७ एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा विशेष ठरणार नाही. कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अचानक खर्चात वाढ होईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी मात्र आजचा दिवस चांगला असणार आहे. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )
शुभ अंक- ३
शुभ रंग-गुलाबी
मूलांक २ साठीसुद्धा आजचा दिवस संमिश्र असणार आहे. दिवस तणावात जाईल. तब्येत सांभाळावी लागेल. आईसोबत संवाद साधून त्यांची मर्जी सांभाळावी. आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)
शुभ अंक- १०
शुभ रंग- हिरवा
मूलांक ३ साठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. प्रकृतीची योग्य काळजी घ्यावी लागेल. श्वासासंबंधी आजार संभवतील. कोणतेही महत्वाचे कार्य करताना वरिष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुलदैवत अथवा तुमची अपार श्रद्धा असणाऱ्या देवाचे जप केल्याने येणाऱ्या अडचणींतून सुटका होईल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)
शुभ अंक-६
शुभ रंग-लाल
मूलांक ४ साठी आजचा दिवस चांगला असणार आहे. दिवसभर केलेल्या कामात नशिबाची साथ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तोंडावर ताबा ठेवावा लागेल. आजच्या दिवशी विजेच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. संशोधन क्षेत्रात असलेल्या ;लोकांना नवा प्रकल्प सुरु करण्यासाठी दिवस शुभ आहे. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)
शुभ अंक-१२
शुभ रंग-लाल
मूलांक ५ असणाऱ्या व्यक्तींना कला कौशल्ये जपण्यासाठी वेळ मिळेल. इतरांकडून कलागुणांची प्रशंसा होईल. व्यवसायात नवी भरारी घेण्याची शक्यता आहे. महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावी अन्यथा गहाळ होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबत चांगला व्यवहार तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवेल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)
शुभ अंक-३
शुभ रंग-निळा
मूलांक ६ असणाऱ्या लोकांना आजचा दिवस संमिश्र असणार आहे. खाजगी आयुष्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. प्रेम प्रकरणापासून दूर राहा. अन्यथा तणाव वाढण्याची शक्यता आहे. गुप्त आजार त्रास देऊ शकतात. अनावश्यक महिलांपासून सांभाळून राहा अन्यथा कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकते. घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)
शुभ अंक-१
शुभ रंग-हिरवा
मूलांक ७ असणाऱ्या लोकांना मुलांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. धार्मिक आस्था वाढून अध्यात्मिक कार्य घडेल. अचानक प्रवास करण्याचा योग जुळून येईल. मात्र आज कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे टाळा. उदा. मोबाईल, टीव्ही. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)
शुभ अंक- ३
शुभ रंग-केशरी
मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा असणार आहे. हातातील महत्वाचे काम निसटण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक-१०
शुभ रंग-चॉकलेटी
मूलांक ९ साठीसुद्धा आजचा दिवस सामान्य असणार आहे. या मूलांकाच्या लोकांनी विजेच्या वस्तूंपासून अंतर ठेवून राहावे. रागावर ताबा ठेवा अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आज कोणतेही वाहन खरेदी करणे टाळा. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)
शुभ अंक- ६
शुभ रंग- पांढरा
संबंधित बातम्या