Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा भागवत एकादशीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!-ank jyotish 7 march 2024 numerology horoscope mulank 1 to 9 ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा भागवत एकादशीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा भागवत एकादशीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Mar 07, 2024 11:28 AM IST

Ank Bhavishya 7 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

आजचे अंकभविष्य ७ मार्च २०२४
आजचे अंकभविष्य ७ मार्च २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ७ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. गुरुवार ७ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला नाही, त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. वाढत्या समस्यांमुळे काहींना काळजी वाटेल. तुमचे आरोग्यही बिघडू शकते, त्यामुळे स्वतःची पूर्ण काळजी घ्या.

मूलांक २- 

गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

मूलांक ३- 

कामावर आणि कुटुंबात सर्वजण तुमच्या हुशारीची प्रशंसा करतील आणि आज प्रत्येकजण तुमचा सल्ला घेऊनच आपले काम करेल. आज तुमचा अडकलेला पैसा अचानक मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी दिवस जाईल.

मूलांक ४- 

तुम्हाला घाईगडबडीचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य असेल, आज कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ नका. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार पद मिळण्याची शक्यता आहे.

मूलांक ५- 

तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, बाहेरचे अन्न आणि अनावश्यक धावपळ यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा पैसे कुठेतरी अडकू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल.

मूलांक ६- 

आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे, पैशाची आवक होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद होत असतील तर आज संभाषणातून संबंध सुधारतील. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल आणि धर्मादाय कार्यात पैसा खर्च कराल.

मूलांक ७- 

पैसे हुशारीने गुंतवा अन्यथा नुकसान होऊ शकते. डोकेदुखीची तक्रार तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते, त्यामुळे काम करण्यात अडचण येऊ शकते. घाईत कामे करणे टाळा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा.

मूलांक ८- 

आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हुशारीने पैसे गुंतवा. कामाच्या ठिकाणी एखाद्याशी वाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहा आणि कोणाशीही वाद घालू नका.

मूलांक ९- 

धनलाभाचे योग आहे. तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाण्याची योजना कराल आणि तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने तुमची बरीच कामे पूर्ण होतील. आज तुमचा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.

विभाग