तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ७ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. रविवार ७ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
मूलांक १- सकारात्मक वाटेल. सर्व कामे करताना ऊर्जात्मक राहाल. आरोग्यात चढ-उतार होईल. कुटूंबातील सदस्य शुभवार्ता देतील. वेळोवेळी अडथळा येईल. जोडीदारास वेळ द्या.
मूलांक २- आरोग्याच्या बाबतीत चढ-उताराचा दिवस आहे. कामाचा जास्त ताण होत असेल तर थोडा ब्रेक घ्या. घरचंच जेवण करा आणि जास्त पाणी प्यावे. करिअरमध्ये मोठा अडथळा येणार नाही. त्रास करून घेऊ नका.
मूलांक ३- दिवस चांगला राहील. सकारात्मक ऊर्जा राहील. तुमच्यातील उत्साहाला जपा आणि ऊर्जेचा योग्य कामात वापर करा. कामावर लक्ष केंद्रित करा आणि दुसऱ्यांपेक्षा वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य सुदृढ राहील.
मूलांक ४- आर्थिक बाबतीत मोठा बदल घडेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. आरोग्याची काळजी घ्या, कामाचा जास्त ताण असू शकतो.
मूलांक ५ - काम आणि वयक्तीक जीवनात संतूलन ठेवा. ताण-तणाव वाटत असेल तर आवडती गोष्ट करण्यात वेळ घालवा. प्रेमाच्या बाबतीत जबाबदारी वाढेल. बाहेरचे, तळलेले पदार्थ खाणे टाळा.
मूलांक ६- आश्चर्यचकित करणारी भेट मिळेल. जोडीदाराच्या भावनेला जपा. करिअरच्या बाबतीत वरिष्ठांची साथ मिळेल. काहितरी नवीन करण्याची मागणी होई शकते. गैरसमज निर्माण होऊ देऊ नका.
मूलांक ७ - रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्यातील ऊर्जेचा वापर कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करा. राजकारणाला बळी पडू नका आणि इकडच्या-तिकडच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका.
मूलांक ८- दिवस फार उत्साहात्मक राहील. जुन्या गुंतवणूकीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला जोडीदार मिळेल. एकाकी असाल तर तुमच्यासाठी भाग्यशाली दिवस आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
मूलांक ९- दिवस सामान्य राहील. कामावर लक्ष केंद्रित करताना थोडा ब्रेक पण घ्यावा. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. ध्यान व व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ ठेऊ शकतात. कामासंबंधी प्रवास घडू शकतो.