तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ७ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. बुधवार ७ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
बदललेली नोकरी लाभदायक ठरेल. आरोग्याप्रती सतर्क राहावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. तुमचे प्रदर्शन तुम्हाला हवे तसे नसेल.
घरात मंगलकार्याचे आयोजन कराल. घरातील लग्नकार्य खूप आनंद देणारे वातावरण तयार करेल. एखादा व्यक्ती तुम्हाला महत्वाच्या कामात मदत करण्यासाठी सीमाबाहेर जाईल. संपत्तीसंबंधी स्थिती चांगली आहे.
नफा वाढल्याने काही लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहील. कार्यक्षेत्रात तुमचे काम कौतुकास्पद राहील. खूप दिवसांपासून विचार करत होतात कुटुंबासाठी काही करण्यासाठी आज चांगला दिवस आहे.
प्रवासासाठी शुभ दिवस आहे. फिरायला जाण्याचा आनंद घ्यायला हवा. एखादी सामाजीक जबाबदारी पार पाडायची गरज आहे.
एखाद्या जवळच्या व्यक्तिचा सल्ला ऐकल्यास पैश्याची वृद्धी होण्याची गरज आहे. तुमच्या मनोवांच्छित माध्यमातून कार्यक्षेत्रात कौतुकास्पद ठराल. व्यावसायिक काही नवीन करण्यासाठी पैसा गोळा करण्यात यश मिळवू शकतात.
कुटुंब तुमची प्राथमिक गरज आहे आणि त्यांच्यासोबत मिळून एखादे नियोजन करण्यासाठी नकार देऊ शकत नाही. समाजातील लोकं तुमचे म्हणणे ऐकतील आणि तुम्हाला समाजात प्रेम मिळेल.
फ्रिलासिंग करणाऱ्यांसाठी आज चांगला नफेचा दिवस आहे. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात महत्वाच्या व्यक्तीच्या जवळीकतेने खूप लाभ होऊ शकतो, यामुळे या संधीचा लाभ घ्या.
घरात एखादे लग्नकार्य होऊ शकते. काही मित्र-मैत्रीण व नातेवाईकांची भेट घेणे बऱ्याच दिवसांपासून बाकी आहे. कार्यक्षेत्रात ताण-तणावाचे वातावरण राहील.
धनसंबंधी लाभ होऊ शकतो. शेअर बाजारात चांगला परतावा मिळेल. कार्यक्षेत्रात लाभदायक ठराल आणि तुम्हाला काही महत्वाचे कार्य सोपवले जाऊ शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या