मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार मासिक शिवरात्रीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार मासिक शिवरात्रीचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 07, 2024 01:14 PM IST

Ank Bhavishya 7 april 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार शिवरात्री आणि मधुकृष्ण त्रयोदशीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य ७ एप्रिल २०२४
अंकभविष्य ७ एप्रिल २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ७ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. रविवार ७ एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन या सर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

ज्या लोकांना सरकारी नोकरीसाठी अर्ज भरायचा होता, आजचा काळ त्यांच्यासाठी अनुकूल आहे. आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. तुम्ही संयम बाळगलात तर आजचा दिवस तुमच्या कुटुंबासोबत आनंदात घालवू शकाल.

मूलांक २- 

आज तुमच्या पालकांना काहीतरी भेट द्या, ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. तुमच्या घरात दिवसभर आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक ३- 

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आजच अर्ज करू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचा दिवस चांगला जाईल. रागावर थोडं नियंत्रण ठेवा. आज पैशाची आवकही होईल.

मूलांक ४- 

विचार न करता कुठेही पैसे गुंतवू नका, तुमचे पैसे कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. आज तुमच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडू शकते, ज्यामुळे तुमच्या घरात तणावाचे वातावरण असू शकते.

मूलांक ५- 

आज तुम्हाला अचानक आर्थिकसंबंधी नवीन संधी मिळतील. तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. आनंदाचा अनुभव घ्याल.

मूलांक ६- 

घरातील अनावश्यक खर्चामुळे तुमचा खर्चही वाढू शकतो. यामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो. यावर उपाय म्हणून आपल्या कुटुंबासमवेत घरी पूजा करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मूलांक ७- 

कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नका. तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. तुमचे कोणतेही सरकारी काम चालू असेल तर ते वेळेत पूर्ण करा, अन्यथा काही नाहक सरकारी दंड भरावा लागेल, असा सल्ला दिला आहे.

मूलांक ८- 

अनावश्यक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण तुम्हाला पोटाच्या विकाराने त्रस्त होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशीही तुमचे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आज संयम बाळगा.

मूलांक ९- 

प्रगतीची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. तुमचे अचानक होणारे खर्च तुमचे लक्ष विचलित करू शकतात, ज्यामुळे तुम्ही मानसिकरित्या अस्वस्थ होऊ शकता आणि तुमचा स्वभावा रागीट होऊ शकतो, म्हणून तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

WhatsApp channel

विभाग