मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 06, 2024 10:46 AM IST

Ank Bhavishya 6 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.

Ank Bhavishya 6 january 2024
Ank Bhavishya 6 january 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ६ असेल तर तुमचा मूलांक ६ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शनिवार ६ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आज कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळतील, यात तुमची उपस्थिती तुम्ही दाखवू शकाल. यामुळे प्रयत्न करा. व्यायाम करून तुम्ही तुमचे आरोग्य जपू शकतात. प्रवासाचे शुभ योग आहे.

मूलांक २- 

मालमत्ता खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सध्या शुभ वेळ नाही, प्रतिक्षा करा. सामाजिक ठिकाणी सावध राहा, तुमच्या विरोधात कोणिही कट रचू शकतात. सुरवातीला तुमचा सल्ला कोणालाही आवडणार नाही.

मूलांक ३- 

गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही वाद जास्त वाढवू नका. संयम ठेवा. गुंतवणूकीसाठी चांगला दिवस आहे. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला आहे.

मूलांक ४- 

कठीण प्रसंगाचा सामना सांभाळून आणि समर्थन देऊन करावे. कुटूंबातील एखाद्या सदस्याचा अहंकारीपणा घातक ठरू शकतो. त्वचे संबंधी किंवा अपचनाची तक्रार चिंतेचे कारण असू शकते.

मूलांक ५ - 

जास्त खरेदी तुमचा बजेट बिघडवून टाकेल. दिवसाची सुरवात तुम्हाला जशी संपवायची तशी करा. ज्यांना उधार पैसे दिले आहे, त्यांच्याकडून परत घेणे कठीण होऊ शकते.

मूलांक ६- 

नवीन कलागुणांना आत्मसात करण्यासाठी गुंतवणूक करा. एकाद्या आजारावर यशस्वी उपचार होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केली असेल तर नफा देणारी ठरेल. शैक्षणिक बाबतीत केलेले कार्य कौतुकास्पद असू शकते.

मूलांक ७ - 

विरोधकांना पराजीत करायचे असेल तर ह्या वेळी थोडे भाऊक व्हावे लागेल. तुमच्या व्यवहारात बदल करा. कार्यक्षेत्रात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल.

मूलांक ८- 

मालमत्ता विक्रीसाठी कठीण काळ आहे. तुम्हाला त्रास होईल. परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे. एखादा उद्योग करू इच्छित असाल, पण त्यासाठी पैसा जमवणे कठीण होईल.

मूलांक ९- 

कार्यक्षेत्रात एखाद्या खास गोष्टीवर निर्णय घेताना थोडा विचार केला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. भाग्याची साथ मिळेल, परंतू गुंतवणूक करताना विचारपुर्वक करा.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग