तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ६ असेल तर तुमचा मूलांक ६ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. मंगळवार ६ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
आजचा दिवस खूपच शुभ राहील. धनलाभाच्या संधी मिळतील. बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या अडचणी संपतील. जीवनात महत्वाचे बदल होतील. कौटुंबीक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. घरात मंगलमय कार्य घडतील. कार्यक्षेत्रात नवीन लोकांशी भेट होईल. मैत्रीमुळे नोकरीचा शोध पूर्ण होईल.
आर्थिक स्थिती सुधारेल. अनेक मार्गाने धनलाभ होईल. कुटुंबात सुरु असलेल्या अडचणीतून मुक्त व्हाल. कामकाजाचे चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. जीवनात अडचणींना घाबरण्याव्यतिरीक्त त्याचे निराकरण करा. घरात आनंदाचे वातावरण राहील. संयम ठेवा. आर्थिक अडचणी लवकर दूर होतील.
नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. मेहनतीने केलेल्या कार्यात लवकर यश मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थितीत हळू हळू सुधारणा होईल. घरात धार्मिक कार्याच्या आयोजनासाठी भरपूर खर्च करावा लागू शकतो. व्यवसायासंबंधी निर्णय हुशारीने घ्यावे आणि डोळे बंद ठेऊन कोणावरही विश्वास ठेऊ नका. आर्थिक नुकसान होऊ शकते.
जास्त खर्चामुळे मन चिंतीत राहील. नवीन बजेट तयार करा आणि विचारपूर्वक आर्थिक खर्च करा. व्यर्थ खर्च टाळा. नात्यात भावनिक ओढाताण राहील. भाऊक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी खूप खास दिवस राहील. कुटुंबात सुख-शांती राहील. आरोग्याची काळजी घ्या. वडीलांच्या मदतीन अडथळे दूर होतील.
आर्थिक वृद्धीच्या नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात तुमचे चोख काम दाखवायला तयार राहा. कामासंबंधी जास्तीची जबाबदारी मिळेल. आत्मविश्वासू राहा. परंतू कार्यक्षेत्रातील राजकारणापासून लांब राहा. कुटुंबात व्यर्थ भांडण टाळा. आर्थिक देणी-घेणी पासून लांब राहा. मित्रांसोबत गाठीभेटी होतील.
आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक वृद्धीचे योग तयार होत आहेत. व्यवसायात वृद्धीच्या संधी मिळतील. खूप मेहनत आणि लक्षपूर्वक काम केल्यास यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. संतती संबंधी सुखद वार्ता मिळेल. जीवनात ऊर्जा आणि ऊत्साहाची कमी नसेल. वैवाहीक जीवनातील अडचणी दूर होतील. मान-सन्मान मिळेल.
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कामातील अडचणी दूर होतील. घरात धार्मिक कार्याचे आयोजन कराल. भाऊ-बहिणीचा पाठिंबा मिळेल. प्रेम-सबंधात गोडवा येईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. मागील गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या मित्र-मैत्रीणीसोबत गाठीभेटी होतील.
नवीन आर्थिक मार्ग उपलब्ध होतील. उधारी वसुल होईल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात नफा कमवाल. कामाच्या नवीन आव्हान स्विकारण्यासाठी आत्मविश्वास भरभरून राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक राहाल. भविष्यासंबंधी मोठे निर्णय घ्याल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल.
आर्थिक स्थर उंचावेल. धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. सरकारचा सहयोग लाभेल. व्यापार विस्ताराच्या संधी मिळतील. व्यापारासंबंधी निर्णय हुशारीने घ्यावेत. कुटुंबासोबत वेळ घालवा. कुटुंबातील सदस्यांना भेट देण्याचा विचार कराल. धार्मिक कार्याचे आयोजन करू शकतात, यामुळे मन प्रसन्न राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या