जोतिष शास्त्रासोबतच अनेक लोकांवर अंकभविष्याचासुद्धा मोठा प्रभाव असतो. अंकभविष्य अंकांच्या आधारे भविष्य सांगण्यास मदत करते. या अंकांना अंकशास्त्रानुसार मूलांक असे संबोधले जाते. अंक जोतिषनुसार आजच्या दिवशी दोन मूलांकावर श्रीगणेशाची विशेष कृपा असणार आहे. तसेच अनेक मूलांकांवर बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. अंकभविष्यानुसार आज बुधवारच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता अंक आणि कोणता रंग शुभ आणि फलदायी ठरणार आहे ते जाणून घेऊया.
मूलांक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस प्रतिकूल असणार आहे. आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. एखाद्या कामात राजकीय क्षेत्रातील लोकांची मदत घेतल्यास काही प्रमाणात फायदा होईल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
शुभ अंक-१३
शुभ रंग-भगवा
मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. काही गोष्टींमुळे मनावर ताण येईल. त्यामुळे निराशा जाणवेल. कोणत्याही क्षेत्रात आज आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे. आज महत्वाची कामे रेंगाळतील. दुर्गा मातेची उपासना केल्यास लाभ होईल.
शुभ अंक -२
शुभ रंग- चॉकलेटी
मूलांक ३ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आज विशेष लाभ होणार नाही. याउलट खर्च वाढेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अथवा जुनी दुखणी पाठ धरतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आज कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नयेत.
शुभ अंक-६
शुभ रंग-निळा
मूलांक ४ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा विशेष नसेल. आज आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. अथवा जवळच्या व्यक्तींकडूनच फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. आज मित्रांसोबत मतभेद होतील. त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. जोडीदारासोबत मात्र दिवस चांगला जाईल. त्यातून लाभ होईल.
शुभ अंक-३१
शुभ रंग- आकाशी रंग
मूलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होतील. व्यवसायिकांसाठी दिवस अनुकूल आहे. कामात गती येईल. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील. तसेच जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा होऊन प्रेम वाढीस लागेल.
शुभ अंक-१०
शुभ रंग-भगवा
मूलांक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. हातात घेतलेल्या कामात अडचणी येतील. एखादे महत्वाचे कार्य अचानक रेंगाळेल. त्यामुळे मन नाराज होईल. दिवसभर पैशांची चणचण भासेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वैचारिक मतभेद उद्भवतील. मनाविरुद्ध गोष्टी घडत असल्याने मन चिंताग्रस्त राहील.
शुभ अंक-१२
शुभ रंग-पिवळा
मूलांक ७ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. आर्थिक बाबींमध्ये निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी. आज शक्यतो गुंतवणूक करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
शुभ अंक-५
शुभ रंग-हिरवा
मूलांक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. आज तुमची बौद्धिक क्षमता फारशी गतिमान नसेल. त्यामुळे महत्वाचे कामे रखडतील. व्यवसायिकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.
शुभ अंक-१८
शुभ रंग-केसरी
मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची एक शिस्त आणि जिद्द दिसून येईल. त्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस खेळीमेळीचा जाईल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा योग जुळून येईल.
शुभ अंक-१३
शुभ रंग-लाल