तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ५ असेल तर तुमचा मूलांक ५ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. शुक्रवार ५ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
महत्वाचा निर्णय पुढे ढकला. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका नाहीतर चुक होऊ शकते. शब्द जपून वापरा आणि कोणाशीही वाद घालू नका. आरोग्य सुदृढ राहील.
फिरायला जाण्याचे आयोजन करू शकतात. यामुळे सुट्टीसाठी अर्ज कराल. कार्यक्षेत्रात नकारात्मक वातावरण राहील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
चांगला दिवस आहे. वेळ कुटूंब नियोजनासाठी चांगला आहे. काही विवाहीत लोक आपलं कुटूंब वाढवण्याची सुरवात करू शकतात. काहींसाठी ताण-तणावाचे वातावरण राहील.
मालमत्ता विक्रीसाठी कठीण काळ आहे. तुम्हाला त्रास होईल. परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे. एखादा उद्योग करू इच्छित असाल, पण त्यासाठी पैसा जमवणे कठीण होईल.
विरोधकांना पराजीत करायचे असेल तर ह्या वेळी थोडे भाऊक व्हावे लागेल. तुमच्या व्यवहारात बदल करा. कार्यक्षेत्रात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल.
कार्यक्षेत्रात एखाद्या खास गोष्टीवर निर्णय घेताना थोडा विचार केला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. भाग्याची साथ मिळेल, परंतू गुंतवणूक करताना विचारपुर्वक करा.
जास्त खरेदी तुमचा बजेट बिघडवून टाकेल. दिवसाची सुरवात तुम्हाला जशी संपवायची तशी करा. ज्यांना उधार पैसे दिले आहे, त्यांच्याकडून परत घेणे कठीण होऊ शकते.
कठीण प्रसंगाचा सामना सांभाळून आणि समर्थन देऊन करावे. कुटूंबातील एखाद्या सदस्याचा अहंकारीपणा घातक ठरू शकतो. त्वचे संबंधी किंवा अपचनाची तक्रार चिंतेचे कारण असू शकते.
नवीन कलागुणांना आत्मसात करण्यासाठी गुंतवणूक करा. एकाद्या आजारावर यशस्वी उपचार होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केली असेल तर नफा देणारी ठरेल. शैक्षणिक बाबतीत केलेले कार्य कौतुकास्पद असू शकते.