Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सोमवारचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य-ank jyotish 5 february 2024 numerology horoscope mulank 1 to 9 ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सोमवारचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार सोमवारचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Feb 05, 2024 11:24 AM IST

Ank Bhavishya 5 february 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा सप्ताहाचा पहिला दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ५ असेल तर तुमचा मूलांक ५ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. सोमवार ५ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आजचा दिवस सामान्य राहील. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. निरोगी जीवनशैली ठेवल्यास आरोग्य सुदृढ राहील. वैवाहीक जीवनात दोघांनी परस्पर गरजांना समजून घेतले पाहिजे.

Horoscope Today 5 February 2024 : नवमपंचम योगात सोमवारचा दिवस गाठीभेटीचा, ताण-तणावही वाढेल! वाचा राशीभविष्य!

मूलांक २- 

आजचा दिवस लकी राहील. करिअरमध्ये होणारे बदल नवीन मार्ग दाखवू शकतात. लॉंग डिस्टेंस नात्यातही तुमचे नाते मजबूत राहील. आर्थिक बाबतीत चढ-उताराचा दिवस राहील. निरोगी राहा.

मूलांक ३- 

नशीबाची साथ मिळेल. भाऊ-बहिणीसंबंधीत एखादी आनंदाची बातमी मिळेल. डाएटच्या बाबतीत कधी कधी चीट केलेलंही चालतं. कामाचे दडपण येऊ शकते. यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वत:ला निरोगी ठेवा.

मूलांक ४- 

कार्यक्षेत्रातील रोमॅन्स टाळला पाहिजे. विवाहीत लोकांनी या गोष्टीपासून चार हात लांब राहीलेलेच चांगले. आज सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल. करिअरसंबंधी जीवनात आव्हानांना वेळेत पूर्ण करा. जंक फूड खाऊ नका.

मूलांक ५- 

मानसिक आरोग्य मजबूत बनवण्यावर लक्ष द्या. विनाकारणच्या ताण-तणावापासून दूर राहा. संतूलन व संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही वाद-विवादात पडू नका, मित्र व जोडीदारासोबत वेळ घालवणे चांगले राहील.

मूलांक ६- 

जीवनात काहीना काही सुरू राहील. खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करू नका. खाण्या-पिण्याची सवय सुधरवा. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. सिंगल असाल तर एखाद्या आकर्षक व्यक्तिची भेट घडेल.

मूलांक ७- 

तणवात्मक वाटेल. घाईगडबडीत कोणताच निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती डगमगू शकते. जीवनात संतुलन ठेवा. कामाचा जास्त ताण घेऊ नका.

Todays Panchang पंचांग ५ फेब्रुवारी २०२४ : पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

मूलांक ८- 

आजचा दिवस चांगला राहील. जुन्या गुंतवणूकीतून चांगला नफा होईल. प्रेम जीवनात डीनर किंवा लॉंग ड्रायवचे नियोजन करून जोडीदाराला खुश करू शकतात. आई-वडिलांचा भरपूर पाठिंबा मिळेल.

मूलांक ९- 

चढ-उताराचा दिवस राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. बॉसच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. शारीरिक आरोग्य चांगले राहील पण मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रेमासंबंधित मुद्दे सोडवण्यासाठी संभाषण गरजेचे आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner
विभाग