Numerology horoscope : जन्मतारखेनुसार पापमोचनी एकादशीचा आजचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!-ank jyotish 5 april 2024 numerology horoscope mulank 1 to 9 ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार पापमोचनी एकादशीचा आजचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार पापमोचनी एकादशीचा आजचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Apr 05, 2024 10:08 AM IST

Ank Bhavishya 5 april 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार वर्षअखेरचा एकादशीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकज्योतिषशास्त्र अंकभविष्य ५ एप्रिल २०२४
अंकज्योतिषशास्त्र अंकभविष्य ५ एप्रिल २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ५ असेल तर तुमचा मूलांक ५ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. शुक्रवार ५ एप्रिल २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

आज तुमच्यासाठी सल्ला आहे की, आज तुम्ही जे काही कराल ते विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन पावले उचलू शकता, ज्यामुळे भविष्यात तुमच्या पैशांचा ओघ वाढण्याची शक्यता वाढेल.

मूलांक २- 

आर्थिक दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे, परंतु आज तुम्हाला तुमच्या पैशाचा योग्य वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अनावश्यक खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. कौटुंबिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस सामान्य आहे. आज तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यामुळे आज तुम्हाला शांत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

मूलांक ३- 

आर्थिक बाबतीत आज तुम्हाला खूप सावध राहावे लागेल.गुंतवणूक करू नका. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचा जोडीदार पुढाकार घेईल आणि प्रत्येक गोष्टीत तुमच्यासोबत उभा राहील. तुम्हाला त्यांचे भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळेल. व्यापार विस्तार होईल.

मूलांक ४- 

तुम्ही कोणतेही काम कराल ते अत्यंत गुप्त पद्धतीने करा. पैशाबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही अनावश्यक खर्चात अडकाल. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाचे नवीन मार्ग उघडतील.

मूलांक ५- 

जे काम कराल ते खूप विचारपूर्वक करा. कोणाशीही वाद घालू नका. आज तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. तुमच्या व्यवसायाला आज काही सरकारी मदतीचा फायदा होऊ शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये आज तुम्हाला तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मूलांक ६- 

आज, कोणावरही द्वेष ठेवू नका कारण विनाकारण कोणाशी तरी मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशाबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर असाल.आज तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने वागा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मूलांक ७- 

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर आजचा दिवस सामान्य आहे. तुम्ही कोणतेही धार्मिक कार्य करत असाल तर तुमच्या निर्णयाचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. कामाच्या बाबतीत समाधान नाही मिळणार.

मूलांक ८- 

आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य असेल. आज कोणालाही पैसे उधार किंवा व्याजावर देऊ नका कारण असे केल्याने तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मूलांक ९- 

व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. आज केलेली मेहनत भविष्यात सोनेरी फळ देईल. कुटुंबासोबत चांगला दिवस घालवाल. तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. जर तुम्ही शांतपणे आणि प्रेमाने बोलाल तर दिवस शांततेत जाईल.

Whats_app_banner
विभाग