मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Shastra 4 May 2024: शनिवारी कोणता रंग आणि अंक तुमच्यासाठी आहे लकी? वाचा आजचे अंकभविष्य

Ank Shastra 4 May 2024: शनिवारी कोणता रंग आणि अंक तुमच्यासाठी आहे लकी? वाचा आजचे अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 04, 2024 12:35 PM IST

Ank Bhavishya 4 May 2024 : अंकशास्त्राच्या गणनेनुसार चैत्र कृष्ण एकादशीचा शनिवारचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य ४ मे २०२४
अंकभविष्य ४ मे २०२४

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने सकरात्मक ऊर्जा हवी असते. अनेक प्रयत्न करुनसुद्धा काही लोकांना मनासारखे यश मिळत नसते. अशावेळी लोक जोतिषशास्त्राचा आधार घेतात. जोतिषशास्त्रात विविध विभाग पडतात. यामध्ये राशीभविष्य, हस्तरेषाशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, अंकशास्त्र असे अनेक सोयीस्कर मार्ग असतात. आता यामध्ये काही लोक राशिभविष्यावर विश्वास ठेवतात. तर काही लोक अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात. अंकशास्त्रचे सोपे गणित असते. यामध्ये तुमच्या जन्मतारखेचा अंकानुसार तुमचा मूलांक ठरवला जातो. या मूलांकावरुन तुमचे येणारे भविष्य कसे असेल हे सांगितले जाते. १ ते ९ या मूलांकानुसार शनिवार ४ मे चे अंकशास्त्र जाणून घेऊया.

मूलांक १

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. कोणत्याही कामात जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. (कोणत्याही महिन्याच्या १, १०,१९, २८, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो )

शुभ अंक-५

शुभ रंग-चंदेरी

मूलांक २

गरजूंना मदतीचा हात देणे चांगले ठरेल. अनेक दिवसांपासून विचारत असलेल्या योजना अंमलात येतील. मन प्रसन्न राहील. (कोणत्याही महिन्याच्या २,११,२०,२९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असेल)

शुभ अंक- २२

शुभ रंग-राखाडी

मूलांक ३

कामाच्या ठिकाणी बौद्धिक बळ दाखवण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रतिमा आणखी मजबूत होईल. भाडेकरूंसोबत वादविवाद होऊन मन उदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. (कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१,३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो)

शुभ अंक-१२

शुभ रंग-हिरवा

मूलांक ४

समाजात स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी लढावे लागेल. वैवाहिक आयुष्यात स्थिरता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. त्यामुळे मनोबल वाढेल. (कोणत्याही महिन्याचा ४, १३, २२, ३१ या तारखेला लोकांचा मूलांक ४ असतो)

शुभ अंक-२

शुभ रंग-क्रीम कलर

मूलांक ५

मूलांक ५ असणाऱ्या व्यक्तींच्या कलाकौशल्यांना आज वाव मिळेल. सामाजिक ठिकाणी मानसन्मान वाढेल. त्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. आत्मविश्वास वाढेल. (कोणत्याही महिन्याचा ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्या मूलांक ५ असतो.)

शुभ अंक- १५

शुभ रंग-पिवळा

मूलांक ६

कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांशक्तींचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. आजचा दिवस तुमच्यासाठी मनोरंजक असेल. रखडलेली कामे होतील. (कोणत्याही महिन्यात ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.)

शुभ अंक-३

शुभ रंग-सोनेरी

मूलांक ७

आजचा दिवस मूलांक ७ च्या लोकांसाठी चांगला असणार आहे. तुमच्या आयुष्यात सकारत्मक बदल घडून येईल. अचानक कामानिमित्त प्रवास घडून येईल. एखाद्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हाल. (कोणत्याही महिन्याचा ७,१६,२५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो.)

शुभ अंक-२७

शुभ रंग-जांभळा

मूलांक ८

मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे. तुमचा वापर करुन घेणाऱ्या लोकांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. आणि स्वतःच्या कलागुणांना वाव द्या. (कोणत्याही महिन्याच्या ८, १७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो.)

शुभ अंक-१४

शुभ रंग-लाल

मूलांक ९

मूलांक ९ साठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. पैसे मिळण्याऐवजी प्रथम शिक्षण पूर्ण करण्यावर भर द्यावा. जुगारापासून दूर राहा अन्यथा नुकसान होऊ शकतो. (कोणत्याही महिन्याच्या ९, १८,२७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो.)

शुभ अंक-१२

शुभ रंग-लिंबू कलर

WhatsApp channel

विभाग