Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा सोमवार मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा सोमवार मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा सोमवार मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Published Mar 04, 2024 12:05 PM IST

Ank Bhavishya 4 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा मार्च महिन्याचा चौथा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

आजचे अंकभविष्य ४ मार्च २०२४, जन्मतारखेनुसार जाणून घ्या
आजचे अंकभविष्य ४ मार्च २०२४, जन्मतारखेनुसार जाणून घ्या

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ४ असेल तर तुमचा मूलांक ४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. सोमवार ४ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

दिवसाच्या सुरुवातीस, काहीतरी जाणून घेण्याची इच्छा अधिक असेल ज्याचा प्रभाव इतरांवर देखील दिसून येईल. तुम्ही तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करणे टाळावे अन्यथा काम कठीण होऊ शकते.

मूलांक २- 

कार्यक्षेत्रात वातावरण चांगले राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारात लाभाच्या संधीचा दिवस आहे.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. फिरायला जाण्याचे नियोजन कराल.

मूलांक ३- 

तुमचा कोणाशी काही वाद असेल किंवा एखादी अडचण असेल तर आज तुम्हाला ती सोडवण्याची संधी आहे. एखाद्याचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे.

मूलांक ४- 

तुमच्या सासरच्या मंडळींकडून तुमच्या कामात गती येईल. आज तुम्हाला एखआदी वस्तू भेट म्हणून मिळू शकते. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे.

मूलांक ५- 

तुम्हाला कामावर पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी हव्या असतील तर तुम्ही लोकांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात.

मूलांक ६- 

कोणत्याही ग्राहक किंवा व्यावसायिक पक्षामुळे व्यावसायिक कामकाजात अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात.

मूलांक ७- 

जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. थकवा येईल.

मूलांक ८- 

तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. संशोधनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. तुम्हाला चांगल्या कामातून प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात.

मूलांक ९- 

तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा सहवास आणि त्यांचे आशीर्वादही हवे आहेत. तुमच्या कामातही प्रगती होऊ शकते. विरोधकांपासून स्वतःचे रक्षण करा. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठीही काही पैसे खर्च करू शकता.

Whats_app_banner