मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार नववर्षाचा पहिला मार्गशीर्ष गुरुवार कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार नववर्षाचा पहिला मार्गशीर्ष गुरुवार कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 04, 2024 10:00 AM IST

Ank Bhavishya 4 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल.

Numerology Horoscope 4 January 2024
Numerology Horoscope 4 January 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ४ असेल तर तुमचा मूलांक ४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. गुरुवार ४ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

मूलांक १ च्या लोकांनी तंदरूस्त राहणे गरजेचे आहे. यामुळे व्यायामासोबत इतरही गोष्टींवर काम करा. आधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, यामुळे प्रगती होईल. उत्तम वेळ आहे.

मूलांक २- 

कार्यक्षेत्रात व्यस्त असाल. कामकाजाची जास्तीची जबाबदारी तुम्हाला सोपवण्याची शक्यता आहे. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घ्यावे. कुटूंबात काही चिंताजनक वातावरण असेल तर त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.

मूलांक ३- 

वेळ खूप चांगला आहे. फिरायला जाण्याचे आयोजन करणार असाल, तर पूर्ण वेळ काढून जा. कुटूंबात मंगलकार्य होईल आणि एखाद्या परिक्षेचे परिणाम येण्याची शक्यता आहे.

मूलांक ४- 

आर्थिक तज्ञांकडून सल्ला घेण्याची गरज आहे, यामुळे लक्ष द्या आणि आपल्या पैश्यांचे योग्य व्यवस्थापन करा. व्यावसायिक लोकांनी कामाकडे जास्त लक्ष द्यावे.

मूलांक ५ - 

व्यावसायिक स्थरावर जे मिळवले आहे त्यासाठी तुमची प्रशंसा होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. आज संपत्ती विकण्याची शक्यता आहे. खरेदी-विक्रीतून चांगला मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

मूलांक ६- 

कुटूंबासाठी एखादे काम सुरू कराल. प्रवास काही बाबतीत फायदेशीर ठरेल. यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.

मूलांक ७ - 

कार्यक्षेत्रातील वातावरण नोकरदार लोकांसाठी चांगले नसेल. यामुळे कामावर लक्ष द्या. ही वेळ मौज-मजेत एखादा छोटा प्रवास करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे मन प्रसन्न होईल. काही लोकांसाठी संपत्ती प्राप्तीचे योग आहेत.

मूलांक ८- 

आरोग्य सुदृढ राहील. आरोग्याची फार काळजी घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. खर्च करताना बजेटवर लक्ष द्या, कारण खर्च जास्त होईल.

मूलांक ९- 

कामासाठी बाहेरगावी जावे लागू शकते. या वेळी तुम्हाला कुटूंबासोबत राहण्याचीही गरज आहे. व्यवसायाच कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)