मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार रविवारचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार रविवारचा आजचा दिवस सर्व मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 04, 2024 12:37 PM IST

Ank Bhavishya 4 february 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा सुट्टीचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology Horoscope, Ank Bhavishya 4 february 2024
Numerology Horoscope, Ank Bhavishya 4 february 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ४ असेल तर तुमचा मूलांक ४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. रविवार ४ फेब्रुवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ 

आजचा दिवस चांगला राहील. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबासोहत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. सकारात्मक दिवस राहील.

मूलांक २- 

लाभदायक दिवस आहे. जुन्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. प्रेम जीवन रोमॅंटिक राहील. प्रियकर प्रेयसीसोबत मौजमजा कराल आणि भविष्यासंबंधी जास्तीत जास्त वेळ घालवाल.

मूलांक ३- 

भाग्यशाली दिवस आहे. जोडीदाराला समजून घ्या आणि मनमोकळं ठेवा. कार्यक्षेत्रात रचनात्मक कामं करून तुमची योग्यता दाखवा. आज घरगुती किंवा इलेक्ट्रॉनीक सामान खरेदी करू शकतात. निरोगी राहा.

मूलांक ४- 

चढ-उताराचा दिवस आहे. कार्यक्षेत्रात जास्त बोलणं टाळा आणि राजकारणापासून दूर राहा. नवीन प्रेमसंबंध जीवन बदलू शकते. व्यावसायिकांना लाभ होईल. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा.

मूलांक ५- 

सकारात्मक राहाल. दिवस चांगला व्यतीत करायचा असेल तर प्रेमाशी संबंधीत मुद्यांचे निराकरण कराल. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांचा सल्ला घेत तुम्ही पुढे जाऊ शकतात.

मूलांक ६- 

तणावात्मक वातावरण वाटेल. कामाच्या दबावामुळे आरोग्यावर नकारात्मर परिणाम होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी अशुभ काळ आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. बाहेरचे खाण-पान टाळा.

मूलांक ७- 

दिवस मस्त राहील. वाद टाळा आणि दिलेले काम पूर्ण करा. जे लोकं नातेसंबंधात अडकले आहे ते आज नात्याला नवीन नाव देण्यासाठी पुढची संधी साधतील. चांगलं खा. आर्थिक अडचण नसेल.

मूलांक ८- 

देणी-घेणीचे व्यवहार करताना सावध राहा. भावनांना मनमोकळेपणाने व्यक्त करा, यामुळे तुमचा जोडीदार खुश आणि समाधानी राहील. सौभाग्याहून मोठा व्यावसायिक मुद्दा तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. वाहन चालवताना, पहाडावर चढताना किंवा कोणतेही नवीन आव्हान स्विकारताना सांभाळून राहिल्यास चांगले होईल.

मूलांक ९- 

नशीबवान राहाल. धनलाभाचे योग तयार होत आहे. जोडीदारासोबत वाद-विवाद सोडवण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.कामाचा ताण घरी नको आणा. घरचे आणि कार्यक्षेत्रातले काम यात समतोल साधावा.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग