मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार महिन्याचा शेवटचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार महिन्याचा शेवटचा दिवस मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 31, 2024 11:41 AM IST

Ank Bhavishya 31 january 2024: आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Ank Bhavishya, Numerology 31 january 2024
Ank Bhavishya, Numerology 31 january 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३१ असेल तर तुमचा मूलांक ४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. बुधवार ३१ जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा, विनाकारण गुंतवणूकीत वेळ वाईट करून घेऊ नका. व्यवसायात आपल्या कायद्याने चला, चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी चांगले काम करा.

मूलांक २- 

नुतनीकरणाचा विचार कराल, परंतू आर्थिक स्थिती पाहून काम करा. बजेट मध्ये गडबड होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला फिरायला जाण्यासाठी वेळ काढावा लागेल. संपत्ती बाबतीत काही चांगले परिणाम मिळतील.

मूलांक ३- 

व्यायाम आणि खाण्या-पिण्यात संतुलन ठेवल्यास तुमचे आरोग्य सुदृढ राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. व्यर्थ खर्च टाळा. करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल.

मूलांक ४- 

अचानक पाहुण्यांच्या येण्याने गडबडून जाल, परंतू तुमचा मौजमजेचा आनंद द्विगुणीत होईल. आज थोडा आराम करा. काहीजण संपत्ती खरेदी करू शकतात.

मूलांक ५ - 

चांगले खाण-पान तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील दुसऱ्यांची मदत पण करा. व्यावसायिक जीवनात काही महत्वाची कामे कराल.

मूलांक ६- 

कुटुंबातील सदस्य प्रवास करून परत आल्यावर मोज-मस्तीत वेळ जाईल. गुंतवणूकीसाठी विचारपूर्वक पर्याय निवडा. व्यापारात लाभाचे योग आहेत. सर्व सदस्यासोबत संपर्कात राहील्यामुळे तुमच्या प्रयत्नांचे सोशल साइडवर कौतुक होईल.

मूलांक ७ - 

डाएट काम करत आहे आणि तुमच्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी चांगले आहे. चांगली आर्थिक स्थिती तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. कार्यक्षेत्रात त्या लोकांसमोर तुम्हाला तुमचे मत व्यक्त करता येईल जे त्यासाठी पात्र आहेत.

मूलांक ८- 

आवडते पाहुणे आल्याने घरात मंगलकार्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नामुळे प्रेम जीवन आनंददायक राहील. यामुळे तुमचे नाते मजबूत राहील. संपत्तीचे मालिक रियल्टी मार्केटमध्ये धमाल करण्यात सक्षम राहतील.

मूलांक ९- 

आर्थिक स्थितीच्या कारणाने दुसऱ्यांना मदत करण्यात तुम्ही नेहमी पुढे राहाल. व्यावसायिक जीवनात लाभ होतील अशी अपेक्षा राहील. कुटुंबातील एखाद्या तरूणाला मदत केल्याने तुमचे मन समाधानी होईल. मालमत्ते संबंधी सौदा करण्यासाठी चांगला दिवस आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग