तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३१ असेल तर तुमचा मूलांक ३+१=४ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. रविवार ३१ डिसेंबरचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
खर्च जास्त होईल, त्यामुळे चिंतीत असाल. जास्त देणी-घेणीचे व्यवहार टाळा. समाजात मान-सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात होणारे वाद-विवाद टाळा. नवीन जबाबदारी मिळेल. इच्छुक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देश-विदेशात जाण्याची संधी मिळेल.
नात्यात गैरसमज होतील त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. एकमेकांना जास्त वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या. फिरण्याचे नियोजन करू शकतात. जीवनात काही बदल घडतील. तुमचे सर्व निर्णय अचुक ठरतील. कार्यक्षेत्रात नवीन कल्पनांना यश मिळेल.
व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. विरोधक कार्यरत होईल, त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. नात्यातील परस्पर मतभेद सोबत बसून सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराने आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. सर्व कार्यात यश मिळेल.
आर्थिक वृद्धीच्या संधी मिळतील. व्यावसायिक जीवनात तुमच्या कामकाजाची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी आहेत, पण विचारपूर्वक गुंतवणूक करा. कुटूंबासोबत चांगला वेळ घालवाल.
करिअरसाठी महत्वाची वेळ आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. समाजात मान-सन्मान वाढेल. कार्यात जबाबदारी मिळेल. मेहनत आणि समर्पण ठेवल्यास कार्य यशस्वी ठरतील.कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
स्पर्धा-परिक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल. आर्थिक स्थिती सुदृढ असेल. करिअर मध्ये प्रगतीच्या संधी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. तुमचा पगार वाढेल. नवीन संपत्ती किंवा वाहन खरेदी करू शकतात. कुटूंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.
नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. सकारात्मक राहाल. संपत्ती खरेदी करण्याचा विचार असेल तर एक दोन दिवसात त्याचा मालकी हक्क मिळेल. व्यवस्थित नियोजन केले तर चांगली बचत करू शकतात.
वडीलोपार्जीत संपत्तीतून धनलाभ होईल. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. वैवाहीक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुठेतरी फिरायला जाण्याचे नियोजन कराल. आजचा दिवस चांगला आहे. कुटूंबात थोडे मतभेदाचे वातावरण राहील.
व्यावसायिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. वाद-विवादापासून दूर राहा. धार्मिक स्थानाला भेट देऊ शकतात, फिरण्याचे नियोजन कराल. आलेले काम पूर्ण होईल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आत्मविश्वास वाढेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)