तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुयम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३० असेल तर तुमचा मूलांक ३+०=३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. शनिवार ३० मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.
मूलांक १ - तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही प्रस्ताव मिळतील जे तुम्हाला सरकारी कामाशी जोडतील. आज दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल.
मूलांक २- पालकांकडून सहकार्य मिळेल. आज तुमचे नाव प्रसिद्ध होईल. आज तुम्हाला पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. मान-सन्मानाची संधी मिळेल. कुटुंबातील संबंध मधुर होतील.
मूलांक ३- पैशाचे व्यवहार टाळा अन्यथा पैसे अडकू शकतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज विचार न करता कोणालाही सल्ला देऊ नका अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल.
मूलांक ४- वडिलांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे त्यांना धावपळ करावी लागेल. पैशाशी संबंधित बाबींमध्येही काही अडथळे येऊ शकतात. कोणत्याही प्रकारची मान हानी तुमचे लक्ष विचलित करू शकते. आज तुमच्या जोडीदारासोबत चांगले राहणे फायदेशीर ठरेल.
मूलांक ५- नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात ग्राहकामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचे खर्च वाढू शकतात, त्यामुळे मानसिक तणावही वाढेल.
मूलांक ६- कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा, भांडणापासून शक्यतो दूर राहा. आज तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काही दिवस थांबा. एखाद्याकडून अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळेल.
मूलांक ७- नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.
मूलांक ८- आज तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात काही मुद्द्यावरून वाद वाढू शकतात, आज तुम्ही शांत राहा आणि रागावर नियंत्रण ठेवा असा सल्ला आहे. वडिलांच्या प्रकृतीबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.
मूलांक ९- तुमची सर्व नियोजित कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही नवीन कामाकडे वाटचाल कराल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर प्रफुल्लित राहाल. तुम्हाला पालक आणि मुलांकडून पूर्ण प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
संबंधित बातम्या