मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार महिन्याचा शेवटचा मंगळवार सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार महिन्याचा शेवटचा मंगळवार सर्व मूलांकासाठी कसा जाईल, जाणून घ्या

Jan 30, 2024 10:54 AM IST

Ank Bhavishya 30 january 2024 : आज पौष शुक्ल पंचमी तिथी असून, हा या महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

Numerology horoscope, Ank Bhavishya 30 january 2024
Numerology horoscope, Ank Bhavishya 30 january 2024

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३० असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. मंगळवार ३० जानेवारी २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आज तुम्हाला सुखद वार्ता मिळेल. तुम्ही जर आजारी असाल तर लवकरच तब्येतीत सुधारणा होईल. ज्यांना परतावा हवा असेल त्यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी, यासाठी चांगला अभ्यास करावा. कुटुंबात बजेटवर दबाव राहील. लांबच्या प्रवासामुळे थकवा येईल.

मूलांक २- 

आजचा दिवस शुभ आहे. पूर्ण संपत्ती विकावी लागेल. तुमचे आरोग्य सुधारेल. चांगली नोकरी मिळेल, ज्यामुळे तुमचे भाग्य उजागर होईल. घरातील महिलांना दडपण वाटेल.

मूलांक ३- 

काही बदल हवा असेल, प्रवास चांगला होऊ शकतो. ज्या घरात तुम्ही राहता त्याच्या सुरक्षेसंबंधी निष्काळजी राहू नका. मालमत्तेचा धंदा करणाऱ्यांसाठी बाजारात चांगला काळ आहे. संध्याकाळी आनंदवार्ता तुमची वाट बघत आहे.

मूलांक ४- 

दररोज व्यायाम केला पाहिजे. कोणाकडून आर्थिक मदत मागितली असेल तर ती मिळेल, परंतू हा सौदा काही नियमात होईल. व्यावसायिक जीवनात काही अडचणी सांभाळून घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवनात काही चिंता असू शकतात.

मूलांक ५ - 

आजचा दिवस थोडा कठीण राहील. जर तुम्ही एखाद्या रोमांचक ठिकाणी फिरायला जात असाल तर लक्षात ठेवा गरजेचा सर्व सामान सोबत असायला हवा. तुम्हाला मालमत्ता मिळेल, परंतू यासंबंधी तुमचे दोन मते असतील.

मूलांक ६- 

मूलांक ६ च्या लोकांनी आपल्या सुदृढ आहारासोबत चालढकल नाही केली पाहिजे. प्रेमजीवन रुळावर राहील. जोडीदारासोबतचे चांगले क्षण तुमच्या जीवनात आनंद घेऊन येतील. मंगलयोगाचा काळ आहे. या वेळेचा सदुपयोग करा व फायदा घ्या.

मूलांक ७ - 

फायदेशीर दिवस आहे. जर तुम्हाला चिंतामुक्त जीवन हवे असेल तर सुदृढ जीवनशैली व दररोज व्यायाम केला पाहिजे. आज कार्यक्षेत्रात काम वेळेत पूर्ण कराल.

मूलांक ८- 

आर्थिक बचतीत वाढ होईल, यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टिंची खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एखादा मित्र किंवा नातेवाईक सुट्टीच्या दिवशी आमंत्रण देईल.

मूलांक ९- 

जर तुम्ही मालमत्ता खरेदी करू इच्छित असाल तर सर्व व्यवहार करताना त्यातील बारीक बारीक गोष्टीं लक्षपूर्वक बघा आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग