मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार मार्च महिन्याचा पहिला रविवार मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार मार्च महिन्याचा पहिला रविवार मूलांकासाठी कसा जाईल, वाचा अंकभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 03, 2024 10:02 AM IST

Ank Bhavishya 3 march 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा मार्च महिन्याचा पहिला रविवारचा दिवस कसा जाईल, तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या.

अंकभविष्य ३ मार्च २०२४
अंकभविष्य ३ मार्च २०२४

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३ असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. रविवार ३ मार्च २०२४ चा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १ - 

तुमच्या जोडीदारासोबत तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्या बोलण्यात आणि कामात गोडवा राखणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. तुमची नियोजित कामे पूर्ण होतील आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

मूलांक २- 

कामामुळे तुम्ही थोडे चिंतित आणि अस्वस्थ दिसत असाल. रागावर नियंत्रण ठेवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. आत्मविश्वास कायम ठेवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.

मूलांक ३- 

तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे आज तुमची संपत्तीही वाढेल. तुम्ही तुमचे मत धैर्याने मांडू शकता, ज्याचा इतरांवर नक्कीच प्रभाव पडेल. पुढे जाण्याची संधी मिळेल.

मूलांक ४- 

सध्या काही गोष्टींमुळे तुम्ही तुमचा निर्णय योग्य रीतीने घेऊ शकणार नाही, पण या काळात तुमच्या ज्ञानातही वाढ होईल. तुमची नैतिक मूल्ये सर्वोच्च ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकाल.

मूलांक ५- 

आर्थिक जीवनात तुमची प्रगती होईल पण त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आज काही छोट्या कामांनाही जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे निराश होऊ नका.

मूलांक ६- 

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतात, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. तुमचे खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेट तयार करा. आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक ७- 

स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आज तुमच्याकडे पैसा येईल, पण तो तुमच्या हातात थांबणार नाही, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ८- 

आर्थिक संबंधित काही निर्णय आज काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रवास करताना तुमच्या सामानाची काळजी घ्या. व्यावसायिकांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक ९- 

कुटुंबाकडूनही काही मदत मिळू शकते. मुलांकडून कुटुंबात नवीन गोष्टी येऊ शकतात. तुमच्या स्वभावातही सकारात्मक बदल दिसून येतील.

WhatsApp channel

विभाग