मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope: जन्मतारखेनुसार नववर्षाचा पहिला बुधवार कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार नववर्षाचा पहिला बुधवार कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 03, 2024 09:53 AM IST

Ank Bhavishya 3 january 2024: अंकशास्त्राच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल हे पाहता येते. तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या नववर्षाचा पहिला बुधवार तुमच्यासाठी कसा जाईल.

Numerology Horoscope
Numerology Horoscope

तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ,जर तुमची जन्मतारीख ३ असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. अंकशास्त्रात, मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरु आहे. बुधवार ३ जानेवारीचा दिवस व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन यासर्वांचा विचार केला तर कसा जाईल ते जाणून घ्या.

मूलांक १- 

आजचा दिवस खास आहे. करिअर जीवन थोडे व्यस्त राहील. सायंकाळी जोडीदारासोबत चांगल्या क्षणांचा अनुभव घ्याल. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. खर्च करताना सांभाळून खर्च करावा. आर्थिक स्थितीवर लक्ष द्या.

मूलांक २- 

दिवस सामान्य राहील. कामाच्या दडपणातून वाचा आणि विनाकारण चिंता करू नका. ३० मिनिट दररोज व्यायाम करा, तुमच्यासाठी चांगले राहील. आपल्या भावना जोडीदारासोबत शेअर करा. आर्थिक जीवन संतुलीत राहील. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.

मूलांक ३- 

आजचा दिवस चढ-उताराचा राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि धनलाभ पण होईल. जास्त खर्चही राहतील. चिंता करू नका आणि कामाचा ताण घरी घेऊन येऊ नका, बाहेरचे खान-पान टाळा.

मूलांक ४- 

आजचा दिवस रोमांचक राहील. एकांकी जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती येईल. करिअरमध्ये संतुलन ठेवा. तुमचा स्वभावच तुमचे यश आहे. स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.

मूलांक ५ - 

लाभदायक दिवस आहे. एखादा नवीन प्रकल्प हाती लागेल. यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज आत्मविश्वास राहील. प्रेमसंबंध असणाऱ्यांनी जोडीदाराला वेळ देण गरजेचे आहे, बाहेरचे खान-पान टाळा. चांगली बातमी मिळेल.

मूलांक ६- 

आज तुमचा दिवस नेहमीसारखा मिळता-जुळता आहे. जोडीदारासोहत वाद-विवाद होतील. रागावर नियंत्रण ठेवा, कुटूंबातील एखाद्या व्यक्तिला आर्थिक मदत करावी लागेल, ज्यामुळे इतर गोष्टींवर परिणाम होईल.

मूलांक ७ - 

आजचा दिवस फायदेशीर राहील. करिअरमध्ये तुम्हाला वरिष्ठांची मदत होईल. काही खास जबाबदारी मिळेल. आज सकारात्मक राहा. धनलाभाचे योग तयार होत आहे. आरोग्य चांगले राहील, पण बाहेरचे खाऊ नका.

मूलांक ८- 

आज स्वत:वर प्रेम करा. ताण-तणावातून वाचण्यासाठी मेडीटेशन करा. आर्थिक बाबतीत चढ-उतार राहील. कामाच्या बाबतीत प्रवास करावा लागेल. कामाचा जास्त ताण वाटत असेल तर थोडा ब्रेक घ्या.

मूलांक ९- 

आज तुमचा दिवस मस्त राहील. जुन्या गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. करिअरच्या बाबतीत सकारात्मकता वाटेल. आज आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरचे खाऊ नका. जीवनात रोमॅंन्स पण राहील.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग